मुंबई, 10 मार्च : भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये रेल्वे वाहतूक हे दळणवळणाचं महत्त्वाचं साधन आहे. आज रेल्वे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पोहचलेली आहे आणि दररोज त्यातून लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे वाहतुकीचा हा पसारा सांभाळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाला मनुष्यबळाची गरज भासते. त्यासाठी मंत्रालयातर्फे वेळोवेळी नोकरभरती केली जाते. आताही रेल्वे मंत्रालय प्रतिनियुक्तीवर असिस्टंट प्रोग्रॅमरपदाच्या 12 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्रालयाच्या 2023 भरतीच्या अधिकृत सूचनेनुसार, निवडलेल्या उमेदवाराला 44 हजार 900 रुपये ते 1लाख 42 हजार 400 रुपयांदरम्यान मासिक पगार दिला जाईल. नोकरीचं ठिकाण नवी दिल्ली असेल. ‘स्टडी कॅफे’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. पोस्टचं नाव आणि संख्या: रेल्वे मंत्रालय भरती 2023 च्या अधिकृत सूचनेनुसार, मंत्रालयानं असिस्टंट प्रोग्रॅमरपदासाठी अर्ज मागवले आहेत. एकूण 12 रिक्त जागांसाठी कर्मचारी भरती होणार आहे. नोकरीचं ठिकाण आणि कार्यकाळ: निवडलेल्या कर्मचाऱ्यांना नवी दिल्ली येथे काम करावं लागेल. प्रतिनियुक्तीवर घेतलेल्या या कर्मचाऱ्यांचा सुरुवातीचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. IT Jobs: मोठी IT कंपनी भारतात करणार पदभरती; इंजिनीअरसह विविध पदांसाठी ओपनिंग्स; करा अप्लाय वयोमर्यादा: रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत सूचनेमध्ये दिल्याप्रमाणे, अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत उमेदवाराचं वय 56 वर्षांपेक्षा जास्त नसावं. पे स्केल: निवडलेल्या उमेदवारांना 44 हजार 900 रुपये ते 1 लाख 42 हजार 400 रुपयांपर्यंत मासिक पगार मिळेल. पात्रता निकष: असिस्टंट प्रोग्रॅमर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे खालील पात्रता असणं आवश्यक आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, विद्यापीठे, मान्यताप्राप्त संशोधन संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, अर्ध सरकारी, मान्यताप्राप्त किंवा स्वायत्त संस्थांचे अधिकारी या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. डिग्रीपर्यंत शिक्षण नाही तरीही उभी केली जगातील सर्वात मोठी कंपनी; गॅरेजमधून झाली होती सुरुवात 1) मुख्य केडर किंवा डिपार्टमेंटमध्ये कायमस्वरूपी अॅनॉलॉगस पोस्टवर कार्यरत असावा किंवा, पे मॅट्रिक्सच्या (35400-112400) लेव्हल-6 मधील पाच वर्षांच्या सेवेसह किंवा समतुल्य, पेरेंट केडर किंवा विभागात नियमितपणे नियुक्ती झालेली असावी. 2) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून कॉम्प्युटर अॅप्लिकेशन, कॉम्प्युटर सायन्स किंवा माहिती तंत्रज्ञानामध्ये पदव्युत्तर पदवी घेतलेली असावी किंवा, मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बी.ई. किंवा बी. टेक पदवी मिळवलेली असावी. (कॉम्प्युटर इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग किंवा माहिती तंत्रज्ञान)
इच्छुक आणि पात्र उमेदवार रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेला अर्ज भरू शकतात. हा भरलेला अर्ज रेल्वेचे उपसचिव, कक्ष क्रमांक 110-सी यांना पाठवू शकतात. 25 फेब्रुवारी ते 3 मार्च 2023 रोजीच्या एम्प्लॉयमेंट न्यूजच्या आवृत्तीत नोटीस प्रकाशित झाल्यापासून 60 दिवसांच्या आत हा भरलेला अर्ज रेल भवन, रायसीना रोड, नवी दिल्ली-110001 या पत्त्यावर पाठवायचा आहे.