JOIN US
मराठी बातम्या / करिअर / महिलांनो, Google मध्ये तुमच्यासाठी नोकरीची मोठी संधी; या लिंकवर करावं लागणार Apply

महिलांनो, Google मध्ये तुमच्यासाठी नोकरीची मोठी संधी; या लिंकवर करावं लागणार Apply

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अशा अनेक स्पर्धांचे आयोजन केले जाते. गुगल गर्ल हॅकाथॉनमध्ये विजेत्या इंजिनीअर मुलींना रोख बक्षिसेही दिली जातील.

जाहिरात

मुलींसाठी 'गर्ल हॅकाथॉन'ची अधिकृत घोषणा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 मार्च: गुगलमध्ये नोकरी (Jobs in Google) करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुलींसाठी (Women jobs in Google) विशेष संधी आहे. वास्तविक, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गुगलने मुलींसाठी ‘गर्ल हॅकाथॉन’ची (Google Girl Hackathon) अधिकृत घोषणा केली आहे. याद्वारे इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना गुगलमध्ये नोकरी (Engineers jobs in Google) करण्याची संधी मिळणार आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की गुगलमध्ये नोकरी करून अनेक सुविधांचा लाभ घेता येतो. गुगल इंडियातर्फे विद्यार्थिनींसाठी ‘वुमन कोडर्स- गर्ल हॅकाथॉन’ स्पर्धा आयोजित केली जात आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अशा अनेक स्पर्धांचे आयोजन केले जाते. गुगल गर्ल हॅकाथॉनमध्ये विजेत्या इंजिनीअर मुलींना रोख बक्षिसेही दिली जातील. शिक्षकांनो, सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; सैनिक स्कुलमध्ये जॉबसाठी आताच करा अर्ज Google India द्वारे आयोजित या स्पर्धेसाठी (Google Girl Hackathon) तुम्हाला buildyourfuture.withgoogle.com वर अर्ज करावा लागेल. गुगल गर्ल हॅकाथॉनसाठी फक्त त्या मुलीच अर्ज करू शकतात, ज्यांनी कॉम्प्युटर सायन्स आणि आयटी संबंधित विषयात पदवी आणि पदव्युत्तर अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम केला आहे. इच्छुक विद्यार्थिनी 9 मार्च 2022 पर्यंत अर्ज करू शकतात. गुगल गर्ल हॅकाथॉन स्पर्धा 19 मार्च ते 30 एप्रिल 2022 या कालावधीत 3 टप्प्यांत होणार आहे. यामध्ये भारतीय विद्यार्थिनींना एक संघ म्हणून त्यांचे कोडिंग कौशल्य दाखवावे लागेल. तसेच तांत्रिक आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी सर्जनशील उपाय शोधावे लागतील. यासाठी प्रत्येक संघात 3 मुली असतील. विजेत्या संघांना Google मध्ये नोकरीसाठी मुलाखत आणि रोख बक्षीस जिंकण्याची संधी मिळेल. बोर्डाच्या परीक्षेदरम्यान संपूर्ण राज्यात Internet सेवा ठप्प; या राज्याचा निर्णय Google मध्ये फ्रेशर्सनाही मिळणार संधी नामांकित IT कंपनी Google लवकरच भारतात फ्रेशर्ससाठी मोठी पदभरती (Google Off Campus Drive for freshers) करणार आहे. यासाठीची अधिसूचना (Google Off Campus 2022) करण्यात आली आहे. कोणत्या पदवीधर किंवा पदव्युत्तर उमेदवारांसाठी ही भरती (Google Jobs in Maharashtra) असणार आहे. 2023, 2022, 2021 या वर्षी पास आउट होणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती (Jobs for freshers in Google) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर (How to apply for Google) ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी https://careers.google.com/ या लिंकवर भेट द्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या