जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / काय सांगता! बोर्डाच्या परीक्षेदरम्यान संपूर्ण राज्यात Internet सेवा ठप्प; 'या' राज्याचा ऐतिहासिक निर्णय

काय सांगता! बोर्डाच्या परीक्षेदरम्यान संपूर्ण राज्यात Internet सेवा ठप्प; 'या' राज्याचा ऐतिहासिक निर्णय

काय सांगता! बोर्डाच्या परीक्षेदरम्यान संपूर्ण राज्यात Internet सेवा ठप्प; 'या' राज्याचा ऐतिहासिक निर्णय

नक्की हे पाऊल कशामुळे उचलण्यात आलं आहे? (Why Internet closed in West Bengal) हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जाणून घेऊया.

  • -MIN READ
  • Last Updated :

कलकत्ता, 07 मार्च: संपूर्ण देशात सध्या बोर्डाच्या परीक्षांची (Board Exams) लगबग सुरू आहे. अनेक राज्यांमध्ये बोर्डाच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत तर काही राज्यांमध्ये होणार आहेत. विशेष म्हणजे कोरोनाकाळानंतर सर्व बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन (Offline Board Exams) पद्धतीनं होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांवर प्रचंड ताण आला आहे. पश्चिम बंगालमध्येही बोर्डाच्या परीक्षा (West Bengal Board Exams) 7 मार्चपासून दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु करण्यात आल्या आहेत. या परीक्षेला राज्यातील 6,21,931 विद्यार्थिनी आणि 4,96,890 विद्यार्थी बसणार आहेत. याचपार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल राज्यानं एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या बोर्डाच्या परीक्षांदरम्यान संपूर्ण राज्यात इंटरनेट सेवा बंद (Internet will closed as board exams in West Bengal) ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मात्र नक्की हे पाऊल कशामुळे उचलण्यात आलं आहे? (Why Internet closed in West Bengal) हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जाणून घेऊया. बोर्डाच्या परीक्षांदरम्यान इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार असा निर्णय पश्चिम बंगाल राज्यातर्फे (Internet service closed during boards) पहिल्यांदा घेण्यात आला आहे. अशाप्रकारचे आदेशच पश्चिम बंगाल सरकारनं जारी केले आहेत. पण हे आदेश जारी करण्यामागे नक्की काय कारण आहे? यामुळे विद्यार्थ्यांना काऊ फायदा होईल हे बघूया. Exam Tips: विद्यार्थ्यांनो, अभ्यास करून प्रचंड कंटाळा आलाय? मग असे व्हा Refresh काय आहेत राज्यसरकारचे आदेश राज्य सरकारनं जारी केलेल्या आदेशानुसार, “7, 8, 9, 11, 12, 14 आणि 16 मार्च रोजी इंटरनेट बंद राहील’. इंटरनेट सेवा बंद करण्याचा कालावधी सकाळी 11 ते दुपारी 3.15 पर्यंत असेल.’’ सरकारी आदेशात म्हटलं आहे की, भारतीय संविधानानं भारतीय नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याची तरतूद केली आहे. परंतु त्याच वेळी राज्य सरकारांना आवश्यक असल्यास काही प्रतिबंधित पावलं उचलण्याचं स्वातंत्र्यही दिलं आहे. त्याच भावनेनं सरकारनं ठरलेल्या तारखांना ठराविक कालावधीसाठी इंटरनेट तात्पुरतं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. फोन कॉल्स, मेसेजिंग सेवा तसंच वृत्तपत्रांचे प्रक्षेपण पूर्वीप्रमाणेच सुरू राहील असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे माहिती-संप्रेषण किंवा प्रसारावर कोणतेही निर्बंध घालण्यात आले आहेत असं समजू नये” असं पश्चिम बंगाल सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे. इंटरनेट सेवा ठप्प का? परीक्षेच्या काळात बेकायदेशीर कामांसाठी इंटरनेट सेवा आणि इंटरनेट टेलिफोन सेवा वापरली जाऊ शकते, अशी माहिती गुप्तचर विभागाकडून सरकारला मिळाली आहे. काही संवेदनशील ठिकाणी हा धोका जास्त असू शकतो. म्हणूनच सरकारनं परीक्षांच्या काळात संपूर्ण इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच परीक्षांमध्ये कोणताही अडथळा येऊ नये, कायद्यानं या कामात गुंतलेल्या कोणत्याही व्यक्तीला इजा होऊ नये आणि सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था राहावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हे स्पष्टीकरण राज्य सरकारकडून देण्यात आलं आहे. Exam Tips: परीक्षेदरम्यान Mental Health वरही द्या लक्ष; मिळतील चांगले मार्क्स याआधीही घडल्या आहेत घटना या आधीही 2020 मध्ये 10वीची परीक्षा सुरू होताच व्हॉट्सअॅपवर काही प्रश्नपत्रिकांचे फोटे लीक झाले होते. मात्र, नंतर बोर्डानं पेपर फुटला नसल्याचा दावा केला. त्याचप्रमाणे 2019 मध्येही बंगाली भाषा, गणित, इंग्रजी, लाईफ सायन्स या विषयांचे पेपर व्हॉट्सअॅपवर लीक झाले होते. या सर्व गोष्टी यंदा टाळण्यासाठी राज्य सरकारकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात