JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Career in Advertising: नाव, पैसा आणि ग्लॅमर Advertisement क्षेत्रात आहे सर्वच काही; कसं कराल यात करिअर? एक्सपर्ट्स म्हणतात...

Career in Advertising: नाव, पैसा आणि ग्लॅमर Advertisement क्षेत्रात आहे सर्वच काही; कसं कराल यात करिअर? एक्सपर्ट्स म्हणतात...

Career in Advertising: आज आम्ही तुम्हाला Advertisement क्षेत्रात शिक्षण घेण्यापासून ते करिअरपर्यंत सर्व गोष्टींची माहिती देणार आहोत. विशेष म्हणजे याच क्षेत्रातील एक्सपर्ट्सनी ही माहिती दिली आहे.

जाहिरात

Advertisement क्षेत्रात कसं कराल यात करिअर? एक्सपर्ट्स म्हणतात...

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14, जून: आजकालच्या जगात सोशल मीडियामुळे जाहिरातींचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. अगदी टीव्हीवरील जाहिरातींपासूनते सोशल मीडिया अप्लिकेशनवरच्या जाहिरातींपर्यंत जग समोर गेलं आहे. म्हणूनच या क्षेत्रात करिअर करण्यासाठी अनेक संधी उपल्बध आहेत. त्यात या क्षेत्रात भरघोस पैसेहीमिळतात. विशेष म्हणजे महिला आणि पुरुषांना दोघांनाही या क्षेत्रात प्राधान्य दिलं जातं. पण हे क्षेत्र असं आहे ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे आणि फार कमी लोक या क्षेत्रात चांगलं काम करत आहेत. पण जर तुम्हालाही जाहिरात किंवा Advertising क्षेत्रात काम करण्याची इच्छा असेल किंवा शिक्षण घेण्याची इच्छा असेल तर हे बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला Advertisement क्षेत्रात शिक्षण घेण्यापासून ते करिअरपर्यंत सर्व गोष्टींची माहिती देणार आहोत. विशेष म्हणजे याच क्षेत्रातील एक्सपर्ट् गौरव कुलकर्णी यांनी ही माहिती दिली आहे. चला तर मग जाणून घेऊया. काय शिक्षण घेणं आवश्यक? एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार, Advertisement क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी बारावीनंतर बॅचलर इन ऍडव्हर्टायझिंग (Bachelor in Advertisement) हा कोर्स आहे. तर पोस्ट ग्रॅज्युएशन (Post Graduation in Advertisements) करण्यासाठी कोणत्याही क्षेत्रात पदवी असणं आवश्यक आहे. तसंच या क्षेत्रात करिअर करण्यासाठी मास कम्युनिकेशन किंवा पत्रकारितेचं शिक्षण झालं असलं तरीही काही हरकत नाही. तसंच काही विद्यार्थी आजकाल बारावीनंतर फिल्म मेकिंगचा कोर्स करूनही Advertisement क्षेत्रात पाऊल ठेवत आहेत. जर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल तर MBA इन मीडिया एंटरटेनमेंट हा कोर्सही फायदेशीर ठरेल. मात्र कोणत्याही क्षेत्रातून Advertisement क्षेत्रात येण्यासाठी त्यासंबंधीचं ज्ञान असणं आवश्यक आहे. Top 5 Medical Colleges: ‘हे’ आहेत राज्यातील टॉप मेडिकल कॉलेजेस; NEET UG 2023 च्या मार्कांवर थेट मिळेल प्रवेश हे आहेत काही टॉप कॉलेजेस भारतीय विद्या भवन, (मुंबई, कलकत्ता, चेन्नई, दिल्ली) सेंटर फॉर मास मीडिया, वायएमसीए, नवी दिल्ली इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन्स (आयआयएमसी), नवी दिल्ली केसी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, मुंबई मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्स, अहमदाबाद (एमआयसीए) इंटर्नशिप करणं आवश्यक एक्सपर्ट्सच्या मते, Advertisement क्षेत्रातील शिक्षणानंतर थेट नोकरी मिळणं थोडं अवघड असतं किंबहुना तसं करूही नये. Advertisement क्षेत्रात शिक्षणानंतर कोणत्याही एजन्सीमध्ये किंवा स्टार्टअपमध्ये इंटर्नशिप करणं अत्यंत आवश्यक आहे. इंटर्नशिप केल्यामुळे कामाचा अनुभव येतो आणि त्यामुळे पुढे चांगला जॉब मिळवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. तसंच Advertisement क्षेत्रातील काम आणि बारकावे समजतात. म्हणून इंटर्नशिप करणं आवश्यक आहे. राज्यातील कंत्राटी ग्रामसेवकांसाठी मोठी खूशखबर; सरकारकडून मानधनात थेट इतक्या रुपयांनी वाढ हे स्किल्स तुमच्याकडे असणं आवश्यक क्रिएटिव्हिटी मार्केटिंग स्किल्स Advertisement तयार करण्याचा बेसिक सेन्स लिखाणाची क्षमता Advertising क्षेत्रातील प्रचंड आवड Success Story: अवघ्या 18 रुपये रुपये पगारावर घासले भांडे, टेबलही पुसले; आज ते आहेत 300 कोटींच्या कंपनीचे मालक कुठे मिळू शकते नोकरी? कॉर्पोरेट एजन्सीज Advertising चॅनेल्स Advertising एजन्सीज डिजिटल प्लॅटफॉर्म्स किती मिळतो पगार? Advertisement क्षेत्रातील शिक्षणझाल्यानंतर तुम्ही नोकरी करू शकता. यामध्ये तुम्हाला अगदी सुरुवातीला 15-20 हजार रुपये इतका पगार मिळू शकतो. तर तुम्हाला काही वर्षांचा अनुभव आल्यानंतर साधारणतः 40-60 हजार रुपये इतका पगार मिळू शकतो. प्रोफेशनल लेव्हलला तुम्हाला अंदाजे 1-2 लाख इतका पगार मिळतो असं एक्सपर्ट सांगतात.

नोकरी न करता सुरु करू शकता बिझनेस आजकाल अनेकजण Advertisement क्षेत्रात स्वतःचा बिझनेस सुरु करतात. यासाठी ते स्वतःची कंपनी सुरु करतात किंवा सोशल मीडियावर Advertisement कँपेन करण्यासाठी इतर कंपन्यांची मदत करतात आणि लाखो रुपये कमावतात. तुम्ही या क्षेत्रात एक्सपर्ट झालात की तुम्हीही बिझनेस सुरु करू शकता. काय म्हणतात एक्सपर्ट्स… Advertisement क्षेत्रात करिअर करण्यासाठी तुमच्यात पॅशन आणि जिद्द असणं महत्त्वाचं आहे. तसंच जे लोक क्रिएटिव्ह आहेत आणि ज्यांना कलेचा आदर आहे असे लोक या क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकतात असं Advertisement क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले एक्सपर्ट गौरव कुलकर्णी यांनी सांगितलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या