मुंबई, 15 नोव्हेंबर, जगभरातील मोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा धडाकाच लावला आहे. मेटा फेसबुक, ट्वीटरनंतर आता ई-कॉमर्स क्षेत्रात जगभरात नावारुपास असलेली कंपनी Amazon सुमारे आपल्या 10,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या सूत्रांच्या हवाल्याने एका अहवालात सांगितले आहे की कंपनी या आठवड्यापासून काही विभागातील कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार अलेक्सा आणि रिटेल युनिट आणि एचआर विभागातील कर्मचाऱ्यांची कपात केली जाण्याची शक्यता आहे.
Amazon कडून 10 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या निर्णयात काही अंशी बदलही होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 31 डिसेंबर 2021 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, Amazon कंपनीमध्ये पूर्णवेळ आणि अर्धवेळ असे एकूण 16 लाख कर्मचारी काम करतात. अलीकडेच, कंपनीने सांगितले होते की ते पुढील काही महिन्यांसाठी कंपनीत नवीन नियुक्ती थांबवत आहेत. याचबरोबर amazon कंपनीने काही दिवसांपूर्वी भीती व्यक्त केली होती की यावेळेस सुट्ट्यांच्या काळ दरवर्षीपेक्षा कमी असू शकते.
हे ही वाचा : ऑफिसरचा जॉब सांगून तुम्हालाही मिळू शकते स्वीपरची नोकरी; परदेशात जॉबआधी असे व्हा सावध
मागच्या काही दिवसांपासून ट्वीटर, फेसबुककडून कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता या दोन मोठ्या कंपन्यांच्या यादीत amazon चाही समावेश आहे. Facebook, twitter पाठोपाठ amazon लाही आर्थीक मंदीचा मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे. फेसबुकच्या मूळ कंपनी मेटाने सुमारे 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्क झुकेरबर्ग यांनी बुधवारी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, उत्पन्नात झालेली घसरण आणि तंत्रज्ञान उद्योगात सुरू असलेल्या संकटामुळे हा निर्णय घ्यावा लागला.
अॅमेझॉनच्या आधी, फेसबुकची मूळ कंपनी मेटाने गेल्या आठवड्यात कंपनीच्या 11,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती. याशिवाय, इलॉन मस्कच्या मालकीच्या ट्विटर, मायक्रोसॉफ्ट आणि स्नॅपने देखील अलीकडेच कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला होता.
हे ही वाचा : चोरीसाठी काहीही, मॅक्डोनल्डसमधून 72 हजारांचे तेल केले लंपास, पण…
अॅमेझॉनचे शेअर्स यावर्षी 42% घसरले
दरम्यान, Amazon चे शेअर्स सोमवारी न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजवर $99 च्या किमतीत सुमारे 1.75 टक्क्यांनी घसरले. जगभरातील टेक कंपन्यांमध्ये झालेल्या विक्रीमुळे यावर्षी अॅमेझॉनच्या शेअर्सचे मूल्य सुमारे 42 टक्क्यांनी घसरले आहे.