गणेश दुडम, प्रतिनिधी
मावळ, 15 नोव्हेंबर : खाद्य तेलाचे भावांमध्ये चढउतार अजूनही सुरूच आहे. तेलाच्या किंमती अजूनही सर्वसामान्यांच्या आटोक्याबाहेरच आहे. त्यामुळे चोराने आपला मोर्चा चक्क खाद्य तेलाकडे वळवल्याची घटना मावळमध्ये घडली आहे. लोणावळ्यात मॅक्डोनल्डस् रेस्टॉरंटच्या स्टोअर रूम मधून तब्बल 72 हजार रुपये किंमतीचे तेलाचे चोराने लंपास केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा येथी मॅक्डोनल्डस् रेस्टॉरंटच्या स्टोअर रूममध्ये चोरी झाली आहे. स्टोअर रुममध्ये तब्बल 72 हजार रुपये किंमतीचे तेलाचे कॅन लंपास केले. पण चोरट्याला लोणावळा पोलिसांच्या जलदगती कारवाईमुळे रंगेहाथ जेरबंद करण्यात यश आले आहे. सुमंत सुनिल पडवळ असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
(सावत्र आईला अडकवण्यासाठी बापाने मुलीला दिला गळफास, क्राईम पेट्रोल पाहून रचला कट, नागपूरमधील घटना)
मॅक्डोनल्डस् रेस्टॉरंटमध्ये स्टोअर मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या अक्षय अशोक चव्हाण यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज तपासले असता एक व्यक्ती रेस्टॉरंटच्या खालील मजल्यावरील स्टोअर रूममध्ये असलेले तेलाचे कॅन घेवून जात असलेला दिसला. काही वेळाने संशयित सुमंत पडवळ हा पार्किंगमध्ये आला व त्याने पार्किंगचे पायऱ्यांच्या खाली असलेले दोन ऑईलचे बॉक्स घेतले व जाण्यास निघाला. त्याचवेळी समोरून आलेले पोलीस कॉन्स्टेबल कदम यांना पाहून तो गडबडला आणि खाली पडला. त्यानंतर त्याने तेथून पळून जण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला जेरबंद करण्यात पोलिसाना यश आले.
शिक्षकाचे बंद घर फोडून १२ लाखांचे दागिने लांबविले
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव शहरातील शास्त्री नगरातील बंद घर फोडून अज्ञातचोरट्यांनी घरातील ११ लाख ६९ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(कुख्यात गुंडाच्या बायकोची काढली छेड, तिने असा घेतला बदला की तरुणाचे कापले लिंग)
दत्तात्रय भिला मालपूरे हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शिक्षक असून खासगी शाळेत ते नोकरीला आले. यावेळी बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील ११ लाख ६९ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल चोरून नेल्याचे समोर आले आहे. ते घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. दत्तात्रय मालपुरे यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi news