JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Inspiring Story : 7 वीच्या विद्यार्थिनीने लिहिलं पुस्तक, 11 वर्षांची असतानाच केला विक्रम

Inspiring Story : 7 वीच्या विद्यार्थिनीने लिहिलं पुस्तक, 11 वर्षांची असतानाच केला विक्रम

अद्विका ही तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे.

जाहिरात

अद्विका चंद्रा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नीरज तिवारी, प्रतिनिधी नवी दिल्ली, 29 मे : ज्या वयात मुलं बालपणीच्या मस्तीत हरवून जातात. त्याचवेळी वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी एका मुलीने एक पुस्तक लिहिले आहे. हो हे खरंय. इयत्ता 7वीत शिकणाऱ्या अद्विकाने वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी “द स्काय नाईट” हे पुस्तक लिहून एक आदर्श निर्माण केला आहे. पुस्तक लिहिण्याबरोबरच अद्विकाने ते स्वतः डिझाइन केले आहे. अद्विका नोएडा येथील एका खाजगी शाळेत शिकते. अद्विकाचे कुटुंब मूळचे पाटणाचे आहे. अद्विका लहानपणापासूनच खूप गुणवान विद्यार्थिनी आहे. इयत्ता पाचवीतही ती सेक्शन-6 मध्ये टॉपर होती. अद्विकाच्या अभ्यासात तिची आई सोनम चंद्रा यांचे खूप मोठे योगदान आहे.

अद्विकाची आई शिक्षिका आहे. तर अद्विकाचे वडील पत्रकार आहेत. अद्विका ही तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. तसेच अद्विका ही ब्लॅक पिंक आणि केपॉप ग्रुपची फॅन आहे. द स्काय नाईटमध्ये काय? कुटुंबातील शिक्षणाच्या वातावरणामुळे अद्विकाने लेखन क्षेत्रात आधीच पाऊल ठेवले आहे. अद्विकाने लिहिलेली द स्काय नाईट हे पुस्तक एक राजकन्येची कथा आहे, जी मोठी झाल्यावर राज्य सांभाळते. एक अशी राजकुमारी जी तिच्या एका वाईट स्वप्नालाच तिची प्रेरणा म्हणून घेते. मनोरंजक आणि भावनिक कथेचे मिश्रण असलेले हे पुस्तक Amazonवर देखील उपलब्ध आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या