JOIN US
मराठी बातम्या / मनी / कृषी / 'त्या' घटनेनंतर सिव्हिल इंजिनिअरनं बदलली लाईन, कल्याणला पुरवतो फ्रेश मासे, Video

'त्या' घटनेनंतर सिव्हिल इंजिनिअरनं बदलली लाईन, कल्याणला पुरवतो फ्रेश मासे, Video

Fish farming : आधुनिक पद्धतीने सुरु केलेल्या व्यवसायला मासळी खवय्यांची मोठी पसंती मिळत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 जानेवारी : मासळी म्हटली की आपोआप जिभेला पाणी सुटते. त्यातच ताज्या माशांवर ताव मारण्याची मजा काही औरच असते. यासाठीच कल्याण परिसरात राहणाऱ्या सुयोग अक्केवार या तरुणाने मोठ्या पगाराची नोकरी सोडून बायोफ्लॉक पद्धतीने मुरबाड येथे मत्स्यपालन व्यवसाय सुरू केला आहे. आणि त्यांचा या आधुनिक पद्धतीने सुरु केलेल्या व्यवसायला मासळी खवय्यांची मोठी पसंती मिळत आहे. कशी झाली व्यवसायची सुरुवात?  सुयोग अक्केवार याने सिव्हील इंजीनिअरिंग मध्ये शिक्षण घेतलं असून नोकरी सोडून मत्स्यपालन व्यवसाय करत आहे. स्वराज्य बायोफ्लॉक फिश प्रकल्प सध्या सुरू केला असून यामध्ये माश्यांचे बीज आणून ते मोठे केले जातात. सुयोग अक्केवार याने प्रथमतः या व्यवसायाबाबत प्रशिक्षण घेतलं सर्व समजून घेतल आणि त्यानंतर मत्स्यपालन व्यवसाय सुरू केला आहे. येथे 4 टाक्या असून या मध्ये मत्स्य शेती केली जाते.

Video : महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी वर्ध्याच्या मातीत, आधुनिक शेतीतून लाखोंची कमाई!

संबंधित बातम्या

सुयोग सांगतो की, नोकरी सोबतच मी लहान मोठी काम करत होतो, मात्र, लॉकडाऊनमुळे मोठा फटका बसला. या काळात नोकरी सोडली. त्यामुळे काय करायचं या विचाराने वॉटर ट्रीटमेंट आणि मासे पालन करण्यात आवड असल्याने विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करून बायोफ्लॉक प्रकल्प सुरू केला. आंध्रप्रदेश येथून माश्यांची बीज घेऊन आल्यावर आठ महिने पालन करून वाढविली जातात. फार्म मध्ये माश्यांना ग्रोवेहल कंपनीचं प्रोटीन खाद्य दिलं जातं. आणि व्यवस्थित वाढ झाल्यावर त्यांना विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येतं.  मासळीसाठी खवय्यांची मागणी सुयोग हा दोन प्रकारच्या माश्यांचे बीज घेतो. इंडीयन बासा, गिफ्ट तीलापिया असे दोन प्रकारच्या माश्यांचे उत्पन्न घेतलं जात. ग्राहकांना हवा तो मासा समोर पकडून देत असून ‘आमच्या तळ्यातून, थेट तुमच्या तव्यात’ ही संकल्पना त्यांनी राबवली आहे. फ्रेश ताजे जिवंत मासे खवय्यांना फ्रेश अँड लाईव्ह फिश जंक्शन या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातात. त्यामुळे ताज्या मासळीसाठी खवय्यांची मागणी वाढू लागली आहे. याची किंमत देखील सर्व सामान्यांना परवडेल अशी आहे. दोन्ही मासे हे 250 रुपये किलो तर वजनाप्रमाणे आणि नगा प्रमाणे विक्री केली जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या