वर्धा, 18 जानेवारी : महाबळेश्वर सारख्या थंड हवामान असलेल्या भागातील फळ म्हणून स्ट्रॉबेरीला ओळखले जाते. मात्र, या धारणांना फाटा देत वर्धा येथील एका शेतकऱ्यानं स्ट्रॉबेरीच्या लागवडीचा धाडसी प्रयोग केला असून तो यशस्वी होताना दिसत आहे. महेश पाटील असं तरुण शेतकऱ्याच नाव असून नोकरी सोडून आधुनिक शेतीचा पर्याय महेश यांनी अवलंबिला आहे. शेती म्हटली की त्यात वेगवेगळ्या प्रकारची पिके आली. विदर्भात कपाशी, तूर सोयाबीन चणा या व्यतिरिक्त भाजीपाला पिकविला जातो. शेतीत उत्पन्न चांगले व्हावे, यासाठी शेतकरी अनेक नवनवीन शक्कल लढवीत असतो. त्यासाठी सेंद्रिय शेती असो किंवा ग्रीन हाऊस शेतीचा मार्गसुद्धा शेतकरी अवलंबिताना दिसून येतात. असाच स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग वर्ध्यात केला आहे. वर्ध्यातील कात्री गावातील महेश शंकर पाटील यांनी स्ट्रॉबेरी लागवड केली आहे. सेंद्रिय पद्धतीने केलेली स्ट्रॉबेरीची लागवड यशस्वी झाली आहे. वर्धा जिल्ह्याचे तापमान तसे जास्तच असते. याठिकाणी थंड वातावरणातील फळ चांगले येईल का, ही शंकाच होती मात्र महेश यांनी केलेल्या अभ्यासपूर्ण शेतीतून शंका दूर झाली आहे.
स्ट्रॉबेरीला विशेष चव वर्ध्यासारख्या भागात अशा शेतीच्या लागवडीचा कोणी विचार देखील केला नसेल मात्र महेश यांनी प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. त्यांनी पाऊण एकरात स्ट्रॉबेरीची लागवड केली. त्याची विक्रीसुद्धा सुरू केली आहे. शेतीत सेंद्रिय पद्धतीचा वापर केल्याने त्यांच्या या स्ट्रॉबेरीच्या चवीला विशेष गोडवाही आहे. या शेतीसाठी सुमारे दोन लाखांचा खर्च झाला असून यातून चार लाख रुपयांपर्यंत उत्पादन होण्याचा अंदाज आहे. विदर्भातील ‘या’ मंदिरात संध्याकाळनंतर कुणीच थांबत नाही! पाहा Video नोकरी सोडून शेती तीन वर्षांपूर्वी नोकरी सोडल्यानंतर महेश पाटील यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. पारंपरिक शेतीला फाटा देत त्यांनी शेतीत नवनवीन प्रयोग करण्याचे ठरवले. वडिलोपार्जित अठरा एकर शेती आहे. दरम्यान ते महाबळेश्वर येथे गेले असता त्यांनी स्ट्रॉबेरी शेतीचा अभ्यास केला आहे. आपल्या शेतात याचीच शेती करण्याचा निश्चय केला. सोशल मिडियाचा वापर महेश पाटील यांना शेतीत पत्नीचीही साथ मिळते. शेतीतील कामासोबतच शेतमाल विक्रीच्या मार्केटिंगसाठी त्या काम करतात. स्ट्रॉबेरी विक्रीसाठी त्यांनी सोशल मीडियाचासुद्धा आधार घेतला आहे. याचा त्यांना चांगला प्रतिसादही मिळत आहे. भविष्यात महाबळेश्वर येथे शेतात पिकलेली स्ट्रॉबेरी पाठवू, असा विश्वासही त्यांच्या व्यक्त केला आहे.