औरंगाबाद, 10 डिसेंबर : औरंगाबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजरी आणि ज्वारीच्या किंमती मध्ये 600 ते 700 रुपयांनी क्विंटल मागे भाव वाढ झाली आहे. हिवाळ्यात आरोग्याची जास्त काळजी घेतली जाते. या दिवसात नागरिकांचा पौष्टिक खानपानावर जास्त भर असतो. त्यामुळे नागरिक हिवाळ्यात बाजरी आणि ज्वारी जास्त खरेदी करतात. बाजरीला परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे ही भाव वाढ झाल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती मधील व्यापारी निलेश सोमानी यांनी दिली आहे. यंदा परतीचा पाऊस आला. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उभी असलेली बाजरी बरेच दिवस पाऊस असल्यामुळे काढता आली नाही आणि यामुळे बाजरी काळसर पडली. तसेच नुकसान झाल्यामुळे बाजरी बाजारपेठेत आलेली नाही. यामुळे बाजारपेठेमध्ये बाजरी चांगली असेल तर तिला अधिक भाव मिळत आहे. बाजरीचे भाव वाढल्यामुळे ज्वारी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी पसंती दिली पण बाजारपेठेमध्ये सध्या ज्वारी उपल्बध नसल्यामुळे ही भाव वाढ झालेली आहे, असं निलेश सोमानी यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनो, उंदराच्या भीतीनं ‘ही’ चूक कधीही करू नका, उत्पादनावर होईल परिणाम! Video
ज्वारी बाजरीचे भाव ज्वारी पूर्वी किती : 2300 - 3000 ज्वारी आता किती : 3000 - 3700 बाजरी पूर्वी किती : 1800 - 2300 बाजरी आता किती : 2300- 3000 हिवाळ्यामध्ये प्राधान्याने बाजरीचा समावेश जेवणात केला जातो. आता हिवाळा सुरू आहे. थंडी पडत असल्यामुळे आम्ही बाजरीची खरेदी केली. ज्वारी बाजरीच्या किंमती वाढल्या आहेत, असं नागरिक अरुणा पठाडे यांनी सांगितले.