मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शेतकऱ्यांनो, उंदराच्या भीतीनं 'ही' चूक कधीही करू नका, उत्पादनावर होईल परिणाम! Video

शेतकऱ्यांनो, उंदराच्या भीतीनं 'ही' चूक कधीही करू नका, उत्पादनावर होईल परिणाम! Video

X
ऊसाचे

ऊसाचे पाचट पेटवून न देता त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

ऊसाचे पाचट पेटवून न देता त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Aurangabad [Aurangabad], India

औरंगाबाद, 08 डिसेंबर : सध्या राज्यात ऊसाचा गळीत हंगाम सुरु आहे. कारखान्यांकडून राज्यातील विविध जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या ऊसाची तोडणी सुरु आहे. दरम्यान, ऊस कारखान्याला गेल्यानंतर शेतकरी उंदराच्या भीतीपोटी शेतीचे होणारे नुकसान यामुळे ऊसाचे पाचट पेटवून देतात. मात्र, हे पाचट पेटवून न देता त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावण्याचे आवाहन औरंगाबाद येथील विभागीय कृषी अधिकारी दिनकर जाधव यांनी केले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 35 हजार हेक्टर क्षेत्रामध्ये उसाची लागवड करण्यात आली आहे. पैठण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन घेतलं गेले आहे. यासोबतच इतरही तालुक्यामध्ये उत्पादन घेतलं गेले आहे. सध्या ऊसाचा गळीत हंगाम सुरु असल्यामुळे काही शेतकऱ्यांचा ऊस हा कारखान्याला जात आहे. दरम्यान, ऊस कारखान्याला गेल्यानंतर शेतकरी उंदराच्या भीतीपोटी शेतीचे होणारे नुकसान यामुळे पाचट पेटवून देत आहेत. पण पाचट पेटवून दिल्यामुळे नायट्रोजन, कार्बन आणि गंधक हे अन्नघटक वाया जातात. शिवाय जमीन भाजली गेल्याने जमिनीतील उपयुक्त जिवाणूंचा नाश होतो. त्यामुळे याचा परिणाम उत्पादनावर होतो.

पांढरं सोनं वेचायला परराज्यातून मजूर बोलवण्याची शेतकऱ्यांवर वेळ

पाचट पेटवून न देता त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावावी 

ऊसाचे पाचट किंवा मका, बाजरी, ज्वारीचे पाचट शेतकऱ्यांनी शेतामध्ये पेटवून न देता त्याची शेतातच विल्हेवाट लावली पाहिजे. शेतात या पाचटीचे  विघटन केल्यास जमिनीची पोषकता वाढण्यासाठी मदत होते. पाचट कुजवण्यासाठी फॉस्फेट आणि जिवाणूचा वापर करावा. यामुळे विघटन लवकर होतं आणि यामुळे उत्पादनावर देखील याचा सकारात्मक परिणाम शेतकऱ्यांना दिसून येतो. यामुळे शेतकऱ्यांनी उंदराच्या व इतर नुकसानीच्या भीतीपोटी पाचट जाळून न टाकता त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावली तर त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल, असं विभागीय कृषी संचालक दिनकर जाधव यांनी सांगितलं.

First published:

Tags: Agriculture, Aurangabad, Aurangabad News, Farmer, Local18