JOIN US
मराठी बातम्या / मनी / कृषी / Maharshtra Weather Update : राज्यात कुठे थंडी तर कुठे उन्हाचा तडाखा, मुंबई, पुण्यात अशी असेल स्थिती

Maharshtra Weather Update : राज्यात कुठे थंडी तर कुठे उन्हाचा तडाखा, मुंबई, पुण्यात अशी असेल स्थिती

राज्यात मागच्या 4 दिवसांपासून उन्हाचा पारा वाढत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 फेब्रुवारी : राज्यात मागच्या 4 दिवसांपासून उन्हाचा पारा वाढत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. मागच्या 24 तासांता सोलापूर जिल्ह्यात 37.2 अंश तापमान नोंदले गेले. तर धुळे जिल्ह्यात रात्री सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. धुळे जिल्ह्यात 8 अंश तापमान नोंदवले गेल आहे. दरम्यान राज्यात पारा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. दिवसभर उन्हाचा तडाखा तर रात्री थंडी अशी परिस्थिती असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

राज्यातील उत्तरेत किमान तापमानात घट कायम आहे. धुळ्यासह निफाड येथील गहू संशोधन केंद्रात 8.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळे, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद येथे किमान तापमान 10 अंशांच्या जवळपास आहे. विदर्भासह मराठवाड्याच्या तापमानातही घट झाली आहे. कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात मात्र किमान तापमानात मोठी घट झाली आहे.  

संबंधित बातम्या

हे ही वाचा :  शहर स्वच्छतेसाठी कोट्यवधींंचा खर्च, सर्वात मोठा तलाव मात्र प्रदूषणाच्या विळख्यात, Video

जाहिरात

निरभ्र आकाश, स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे उन्हाचा चटका वाढला आहे. दरम्यान अनेक ठिकाणी तापमान पस्तिशी पार असल्याने उन्हाच्या झळा कायम आहेत. सांगली, सांताक्रुझ, रत्नागिरी येथे तापमान 36 अंशांपार आहे. विदर्भाच्या कमाल तापमानात घट झाली आहे.

दरम्यान मागच्या 24 तासांत पुणे 34.1 (10.6), जळगाव 33 (10.1), धुळे 32 (8), कोल्हापूर 35 (19), महाबळेश्वर 31.6 (13.4), नाशिक 31.2 (10.9), सांगली 36.1 (17.3), सातारा 35.2 (16.4), सोलापूर 37.2 (16.5), रत्नागिरी 36.4 (21.2), औरंगाबाद 32.2 (10.2), नांदेड (16.2), परभणी 34.4 (13.4), अकोला 35 .2 (12.5), 4.8), ब्रम्हपूरी 33.7 (14.6), चंद्रपूर 31 (11), नागपूर 31.8 (11.7) तापमानाची नोंद झाली.

जाहिरात

हे ही वाचा :  Nashik : रेल्वे स्टेशनवर मिळणार शुद्ध हवा, पाहा कसं आहे देशातील पहिलं ऑक्सिजन पार्लर! Video

राज्यातील तापमानात घट होण्याची शक्यता

राज्यातील तापमानात सातत्याने चढ उतार होत आहेत. कधी थंडीचा कडाका तर कधी ढगाळ वातावरण जाणवत आहे. या तापमानातील चढ उताराचा शेती पिकांवर देखील परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, 12,13 आणि 14 फेब्रुवारी दरम्यान राज्यातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे उत्तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव अधिक जाणवण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या