JOIN US
मराठी बातम्या / मनी / कृषी / government job recruitment : राज्य सरकारकडून पशुसंर्वधन विभागात मोठी भरती, कोण करू शकतं Apply?

government job recruitment : राज्य सरकारकडून पशुसंर्वधन विभागात मोठी भरती, कोण करू शकतं Apply?

ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटी करणासाठी राज्य सरकारकडून पशुसंर्वधन विभागातील 2 हजार 500 पदे भरण्यात येणार (2,500 posts will be filled in the Animal Husbandry Department) असल्याचे सांगण्यात आले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 24 : राज्यात मागच्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे विविध शासकीय पदांच्या नियुक्ता रखडल्या होत्या. (government job recruitment) दरम्यान राज्य शासनाकडून विविध शाखेतील शासकीय पदांच्या भरती प्रकिया राबवण्यात येत आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटी करणासाठी राज्य सरकारकडून पशुसंर्वधन विभागातील 2 हजार 500 पदे भरण्यात येणार (2,500 posts will be filled in the Animal Husbandry Department) असल्याचे सांगण्यात आले. ही माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार (Minister Sunil Kedar) यांनी नागपूर येथेो एका कार्यक्रमा दरम्यान माहिती दिली.

यावेळी मंत्री केदार म्हणाले की, पशुपालन शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी अतिशय महत्त्वाचे ठरले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या सबळीकरणासाठी पशुसंर्वधन विभागातील 2 हजार 500 पदे लवकरच भरण्यात येणार असून त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळात मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे असे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार म्हणाले.

हे ही वाचा :  weather forecast : मुंबई, कोल्हापूर, कोकणासह विदर्भाला पुढचे चार दिवस जोरदार पावसाचा alert

संबंधित बातम्या

पशुपालन व्यवसायाने कोरोना महामारीच्या काळात शेतकऱ्यांना मोठी मदत केली आहे. यापुढील काळात पशु व पक्षी पालनातूनच ग्रामस्थांना स्थानिक रोजगारांची निर्मिती करण्यावर भर देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच पशुवैद्यकीय रुग्णालयांमुळे शेतकऱ्यांच्या जनावरांना आरोग्यविषयक सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध झाल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांचे आरोग्य निकोप राहण्यास मोठी मदत होणार आहे. सुदृढ जनावरांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याचे मंत्री केदार म्हणाले.

जाहिरात

कोरोना काळातही  जिल्हा परिषदेने दुधाळ जनावरे, शेळी व गाई यांचे वाटप करुन ग्रामस्थांना आधार दिला. या प्रकारचा पहिला प्रयोग नागपूर जिल्हा परिषदेद्वारे करण्यात आला आहे. त्यातील काही त्रुटी दूर करुन  हा प्रयोग राज्यभर करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन मंत्र्यांनी सांगितले. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी  पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून ग्रामस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात येवून बेरोजगारांना याद्वारे रोजगार उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

जाहिरात

हे ही वाचा : ट्रक आणि पिकअप व्हॅनमध्ये भीषण अपघात; अस्थी विसर्जन करुन येताना कुटुंबावर काळाचा घाला, एकाच कुटुंबातील 6 जण ठार

माहूरझरी येथे पशुवैद्यकीय दवाखान्याचे (उपकेंद्र) लोकार्पण श्री. केदार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, माजी मंत्री रमेश बंग, कृषी व पशुसंवर्धन सभापती तापेश्वर वैद्य, शिक्षण व अर्थ सभापती भारती पाटील, महिला व बालकल्याण सभापती उज्वला बोढारे, नागपूर (ग्रामीण) पंचायत समितीच्या सभापती  रेखा वर्टी, जिल्हा परिषद सदस्य कुंदा राऊत, ममता धोपटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अहमद शेख, पंचायत समिती सदस्य रुपाली मनोहर, प्रिती अखंड, सरपंच संजय कुंटे यावेळी उपस्थित होते.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या