जिंद-चंदीगड रस्त्यावरील कंडेला गावाजवळ मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. ट्रक आणि पिकअपची धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की आजूबाजूच्या गावातही आवाज ऐकू आला. हे सर्वजण हिसार जिल्ह्यातील नारनौंद गावचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींनी सांगितले की, हिस्सार जिल्ह्यातील नारनौड गावातील रहिवासी प्यारे लाल यांचा नुकताच मृत्यू झाला होता. सोमवारी कुटुंबीय पिकअप वाहनाने अस्थिकलश विसर्जन करण्यासाठी हरिद्वारला गेले होते. मंगळवारी सकाळी हरिद्वारहून नारायणला परतत असताना कंडेला गावाजवळ जींदहून कैथलकडे जाणाऱ्या ट्रकला पिकअपची धडक बसली. Congress ला रामराम करणारे हार्दिक पटेल 10 दिवसांत करणार मोठी घोषणा या अपघातात पिकअपच्या पुढील भागाचे पूर्ण नुकसान झाले. डायल 112 टीम घटनास्थळी पोहोचली आणि जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी 6 जणांना मृत घोषित केले तर 17 जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. व्हॅनमध्ये 23 प्रवासी होते ज्यात 6 जणांचा मृत्यू झाला. मृतांची नावे पुढीलप्रमाणे 1. चंनो वय 45 वर्षे 2. शिशपाल वय 39 वर्षे 3. अंकुश वय 15 वर्ष 4.धन्ना वय 70 वर्षे 5.सुरजी देवी वय 65 वर्षे 6. त्यांच्यासोबत आणखी एक नातेवाईक असल्याचे सांगितले जाते ते पंजाबचे आहेत. सदर पोलीस स्टेशनचे प्रभारी दिनेश कुमार यांनी सांगितलं की, समोरासमोर झालेल्या धडकेत हा अपघात झाला. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात घडवून चालकाने ट्रक घटनास्थळीच सोडून पळ काढला. ट्रक जप्त करण्यात आला आहे.कंडेला गांव के पास ट्रक और पिकअप वैन का एक्सिडेंट हुआ। वैन में 23 यात्री सवार थे जिसमें 6 लोगों की मृत्यु हो गई। अन्य लोगों को अस्पताल में भर्ती किया गया। अभी किसी व्यक्ति ने बयान नहीं दिया है, बयान देने के बाद मामला दर्ज़ कर कार्रवाई करेंगे: दिनेश कुमार, सदर थाना प्रभारी, जींद pic.twitter.com/BmbdVC44Bp
— ANI_HindiNews (@AHindinews) May 24, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Haryana