नाशिक 8 डिसेंबर : गेल्या काही महिन्यांपासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने शेतकऱ्याने कांदा घरात साठवून ठेवला आहे. बाजारात योग्य दर मिळत नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्याचे दर घसरल्यामुळे या कांद्याच्या दराची दखल केंद्र सरकारने घ्यावी. यासाठी नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील एका शेतकऱ्यानं 21 कांद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वेगवेगळ्या प्रकारचे चित्र काढत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला आहे. किरण मोरे असे या शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी जवळपास 10 ते 12 दिवसांत हे चित्र साकारले आहे. मोरे यांनी शेतकरी आंदोलनाचे नेते शरद जोशी यांच्या जयंतीदिवशी कांद्यांवर हे चित्र रेखाटले होते. त्यातील 21 कांद्यांवर पंतप्रधान मोदी व एका कांद्यावर शरद जोशी यांचे चित्र काढले. या कांद्यांवरील चित्राच्या माध्यमातून शेतकऱ्याने रात्रीचा दिवस करून पिकवलेला कांदा कवडीमोल भावात विकला जात असल्याचा संदेश दिला आहे.
शेतकऱ्यांनो, उंदराच्या भीतीनं ‘ही’ चूक कधीही करू नका, उत्पादनावर होईल परिणाम! Video
सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कांद्यावर प्रतिकृती साकारल्या आज बाजारात कांद्याला चांगला दर मिळत नाही. सध्या कांद्याला कोंब फुटले आहेत. मात्र सरकारला अद्याप जाग आली नाही. म्हणून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मी शरद जोशी यांच्या जयंतीदिवशी कांद्यावर त्यांची चित्र रेखाटले आहे. एकूण 21 कांद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध ठिकाणच्या, विविध पेहरावातील प्रतिकृती साकारल्या आहेत. हे बघून तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांची जान येईल,त्यांचे प्रश्न समजतील,त्यांच्या डोळ्यातील अश्रू दिसतील. तसेच एका कांद्यावर शरद जोशी यांची प्रतिकृती साकारली आहे. कारण शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अनेक वेळा आवाज उठवला होता. त्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडले होते. पण तरीही पुढे त्याची दखल सरकारने घेतली नाही, अशी माहिती किरण मोरे यांनी दिली आहे.
हमी भाव द्यावा गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरातील शेतकऱ्यांनी हमी भावा संदर्भात मागणी केली आहे. मात्र, त्याकडे अजिबात सरकार लक्ष देत नाही. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून म्हणत आहे की हे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे सरकार आहे. पण जेव्हा शेतकऱ्यांवर आडी अडचणी येतात. तेव्हा दुर्लक्ष केलं जातं. दिवसरात्र काबाडकष्ट करून शेतकरी पीक काढतो. द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवण्याची शेतकऱ्यावर आली वेळ, पाहा Video हे पीक घेऊन शेतकरी बाजारात घेऊन जातो तेव्हा त्याला अक्षरशः कवडीमोल भावात विक्री करावी लागते. मग हे बघून डोळ्यात पाणी येत,पोटच्या मुला सारखं पिकांचा सांभाळ केला जातो. पण हातात काही येत नाही. मायबाप सरकारने लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, मालाला हमी भाव द्यावा हीच अपेक्षा आहे, असंही किरण मोरे यांनी बोलून दाखवलं.