मराठी बातम्या /बातम्या /ahmednagar /

शेततळ्यावर कपडे धुणे जीवावर बेतले, 7 वर्षांच्या भावासोबत बहिणीचा बुडून मृत्यू

शेततळ्यावर कपडे धुणे जीवावर बेतले, 7 वर्षांच्या भावासोबत बहिणीचा बुडून मृत्यू

  आज दुपारी जयश्री शिंदे कपडे धुण्यासाठी शेततळ्यावर गेली होती. यावेळी तिच्यासोबत लहान भाऊ सुद्धा आला होता

आज दुपारी जयश्री शिंदे कपडे धुण्यासाठी शेततळ्यावर गेली होती. यावेळी तिच्यासोबत लहान भाऊ सुद्धा आला होता

आज दुपारी जयश्री शिंदे कपडे धुण्यासाठी शेततळ्यावर गेली होती. यावेळी तिच्यासोबत लहान भाऊ सुद्धा आला होता

संगमनेर, 08 मे :  शेततळ्यावर कपडे धुणे धुण्यासाठी गेलेल्या दोन बहिण भावांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर (sangmner) तालुक्यात घडली आहे.  बहिणीसोबत आलेल्या 7 वर्षांच्या लहान भावाचा पाण्यात बुडून मृत्यू (Sister and brother drowned) झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  संगमनेर तालुक्यातील मोधळवाडीच्या घाणेवस्ती इथं ही घटना घडली आहे. जयश्री बबन शिंदे ( वय २१ ) आणि आयुष बबन शिंदे ( वय ७ वर्ष ) असे मृत बहिण - भावाचे नाव आहे.

पिंपळगाव देपा गावांतर्गत असलेल्या मोधळवाडीतील घाणेवस्ती येथे बबन चांगदेव शिंदे हे आपल्या कुटुंबासमवेत राहातात. रविवारी सकाळी मुलगी जयश्री व मुलगा आयुष हे दोघे बहीण- भाऊ कपडे धुण्यासाठी आपल्याच शेतात असलेल्या शेततळ्यावर गेले होते. आयुष हा शेततळ्यातून पाणी काढत असताना त्याच दरम्यान त्याचा पाय घसरला आणि तो शेततळ्यात पडला. भाऊ शेततळ्यात पडला त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी बहीण जयश्री हिने मागचा पुढचा विचार न करता शेततळ्यात उडी मारली. मात्र दोघेही खोल असलेल्या शेततळ्यातील पाण्यात बुडाले.

(संतापजनक, पोलीस कॉन्स्टेबलचा नात्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार)

जयश्री व आयुष हे दोघे बहीण -भाऊ शेततळ्यात बुडाल्याची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोघांनाही शेततळ्यातून बाहेर काढण्यात आले. मात्र त्या अगोदरच बहीण- भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. दोघांचेही मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर कुटीर रूग्णालयात नेण्यात आले. बहीण- भावाच्या दुर्दैवी मृत्यूने पिंपळगाव देपा गावासह पठारभागावर शोककळा पसरली आहे.

कल्याणमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा बुडून मृत्यू

दरम्यान, शनिवारी रात्री मुंबई जवळील कल्याणमध्येही अशीच एक घटना घडली होती. कल्याण ग्रामीण परिसरातील संदप गावात (sandap village kalyan) दगड खणीत पाण्यात पडून एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये 3 लहान मुलांचा समावेश आहे. कल्याण ग्रामीण भागातील संदप गावाजवळ ही घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.  देसले पाड्यातील पोलीस पाटील सुरेश गायकवाड हे आपली पत्नी मीरा गायकवाड आणि सुनेसह दगड खाणीतील पाणवठ्यावर कपडे धुण्यासाठी आले होते.

('उद्धव ठाकरे दम असेल तर लोकांमध्ये या', नवनीत राणा आक्रमक, BMC निवडणुकीत उतरणार)

यावेळी त्यांच्यासोबत नातू मोक्ष, निलेश आणि मयुरेश सुद्धा सोबत होते. खदानमध्ये पाण्यावर कपडे धुण्यासाठी सर्वजण गेले होते. पण अचानक पाचही जण पाण्यात बुडाले. बराच वेळ झाला सुरेश गायकवाड हे घरी परतले नाही. त्यामुळे घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता पाचही जण पाण्यात बुडाल्याचे आढळून आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशीरापर्यंत पाच जणांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे संदप गावावर शोककळा पसरली आहे. गायकवाड कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

First published: