मराठी बातम्या /बातम्या /ahmednagar /

घाईघाईत उरकला विवाह; दुसऱ्याच दिवशी नववधूचं फुटलं बिंग, नवरदेवाची पोलिसांत धाव

घाईघाईत उरकला विवाह; दुसऱ्याच दिवशी नववधूचं फुटलं बिंग, नवरदेवाची पोलिसांत धाव

लग्नाचं आमिष दाखवून नगरमधील एका मुलाची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. लग्नाच्या दुसऱ्याचं दिवशी नववधूचं बिंग फुटलं आहे.

लग्नाचं आमिष दाखवून नगरमधील एका मुलाची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. लग्नाच्या दुसऱ्याचं दिवशी नववधूचं बिंग फुटलं आहे.

लग्नाचं आमिष दाखवून नगरमधील एका मुलाची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. लग्नाच्या दुसऱ्याचं दिवशी नववधूचं बिंग फुटलं आहे.

  • Published by:  News18 Desk

श्रीगोंदा, 30 जून: लग्नाचं आमिष दाखवून नगरमधील एका मुलाची आणि त्याच्या कुटुंबीयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. ज्या मुलीसोबत लग्न लावून दिलं, त्या मुलीचं अगोदरच लग्न झाल्याचं उघडकीस आलं आहे. संबंधित नवऱ्या मुलीला दोन अपत्य असल्याचंही समोर आलं आहे. याप्रकरणी नगर जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या ज्ञानेश्वर मोहन ढवळे यांनी पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

दीपाली बडदे असं आरोपी नववधूचं नाव असून ती पुण्याजवळील सासवड येथील रहिवासी आहे. तर बापू झुंबर दातीर, कुंडलिक शाहू चव्हाण, अनिता भगवान गिरे आणि वैशाली अशा पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथील रहिवासी असलेल्या ज्ञानेश्वर मोहन ढवळे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

ढवळे यांनी फिर्यादीत म्हटल्यानुसार, आरोपी बापू दातीर यानं काही दिवसांपूर्वी फिर्यादीचे वडील मोहन ढवळे यांच्याशी संपर्क साधला होता. तुमच्या मुलासाठी एक स्थळ असल्याचं सांगत त्यांनी श्रीगोंदा याठिकाणी मुलीला पाहायला येण्याचं आमंत्रण दिलं. 16 जून रोजी ढवळे कुटुंब मुलीला पाहण्यासाठी श्रीगोंद्याला गेले. मुलगी पसंत येताच त्यांनी अवघ्या तीन दिवसांत 19 जून रोजी विवाहही पार पाडला. दरम्यान आरोपी बापू दातीरनं लग्न जमवताना फिर्यादीच्या वडिलांकडून 2 लाख रुपये घेतले होते.

हेही वाचा-पुण्यात सेक्सटॉर्शनच्या प्रकरणांत वाढ; सोशल मीडियातून 275 पुरुषांना लाखोंचा गंडा

लग्न झाल्यानंतर तिसऱ्या दिवसी वधूनं काहीतरी कारण सांगून पळून जायचं, असा प्लॅन वरील सर्वांनी आखला होता. सर्वकाही प्लॅननुसार घडत होतं. पण लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नववधू कोणाशी तरी बोलत असल्याचं मुलाच्या आईला समजलं. त्यामुळे ढवळे कुटुंबीयांनी नववधूचा मोबाइल काढून घेतला. ढवळे यांच्या घरातून पळून जाण्यासाठी आरोपी नववधूननं आपली आई आजारी असल्याचा बाहाणा रचला. पण ढवळे कुटुंबीयातील सदस्यांनी सोबत येण्याची तयारी दर्शवली. यानंतर नववधू दीपालीनं आपल्याला इथं रहायचं नसल्याचं सांगत तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा-लग्नगाठ बांधण्याआधीच नवरदेवाच्या हातात बेड्या; भरमंडपातून थेट तुरुंगात रवानगी

यानंतर ढवळे कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी तपास करताना आरोपींच्या प्लॅनचा पर्दाफाश केला आहे. लग्न झाल्यानंतर तीन दिवसांनी माहेरी जाते असं सांगून तेथून पळ काढायचा प्लॅन वरील सर्व आरोपींचा होता. तसेच लग्नात नववधूला घातलेले दागिने मास्टरमाइंट महिला वैशालीला मिळणार होते. तर या कटात सहभागी झाल्यानं नववधू दीपालीला फिर्यादीच्या वडिलांकडून घेतलेल्या दोन लाखांतील 15 हजार रुपये मिळणार होते. संबंधित आरोपींनी अशाच प्रकारे अनेकांची फसवणूक केली असावी, असा अंदाज पोलिसांकडून वर्तवला आहे. या घटनेचा पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Ahmednagar, Crime news, Fake, Financial fraud, Marriage, Money fraud, Wedding, Woman