• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • लग्नगाठ बांधण्याआधीच नवरदेवाच्या हातात बेड्या; भरमंडपातून थेट तुरुंगात रवानगी

लग्नगाठ बांधण्याआधीच नवरदेवाच्या हातात बेड्या; भरमंडपातून थेट तुरुंगात रवानगी

नवऱ्यामुलासह वऱ्हाडी म्हणून आलेला एक मुलगा, त्या मुलीशी लग्न करण्यास तयार झाला. त्याने मुलीकडील कुटुंबियांकडे तसा प्रस्तावही ठेवला.

नवऱ्यामुलासह वऱ्हाडी म्हणून आलेला एक मुलगा, त्या मुलीशी लग्न करण्यास तयार झाला. त्याने मुलीकडील कुटुंबियांकडे तसा प्रस्तावही ठेवला.

एका लग्नसमारंभात (Marriage Function) अचानक प्रेयसीची (Girlfriend) एन्ट्री झाली, तीदेखील पोलिसांना (Police) सोबत घेऊन. मग काय तरुणीनं हे लग्न थांबवलं आणि पोलिसांनी लग्न मंडपातूनच नवरदेवाला ताब्यात घेतलं

 • Share this:
  लखनऊ 29 जून: गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळापासून देशभरात कोरोनाचा (Coronavirus) प्रसार झाला आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी बऱ्याचदा अनेक राज्यांनी लॉकडाऊनचा (Lockdown) पर्यायही अवलंबला. आता कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असल्यानं बहुतेक राज्यांनी निर्बंध शिथील करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, तरीही सार्वजनिक ठिकाणं, चित्रपटगृह आणि लग्नसमारंभासारख्या कार्यक्रमांमधील (Guidelines for Marriage Function) उपस्थितांच्या संख्येबाबत अनेक नियम आहेत. अशात कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नसमारंभ पार पडत आहेत. मात्र, तरीही या कार्यक्रमादरम्यान अनेक विचित्र घटना घडल्याचं वारंवार समोर येत आहे. असंच आणखी एक प्रकरण आता उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मेरठमधील शिवलोक कॉलनीतून समोर आलं आहे. पत्नीवरील चारित्र्याचा संशय चिमुकलीच्या जीवावर बेतला;क्षणात उद्धवस्त झालं कुटुंब या घटनेत शिवलोक कॉलनीत सुरू असलेल्या एका लग्नसमारंभात अचानक प्रेयसीची एन्ट्री झाली, तीदेखील पोलिसांना सोबत घेऊन. मग काय तरुणीनं हे लग्न थांबवलं आणि पोलिसांनी लग्न मंडपातूनच नवरदेवाला ताब्यात घेतलं. सोमवारी शिवलोक कॉलनीतील एका तरुणीच्या विवाहसोहळ्याचा कार्यक्रम सुरू होता. याचदरम्यान दुपारी नवरदेव वरात घेऊन याठिकाणी दाखल झाला आणि नवरीबाईच्या घरी पोहोचला. आक्षेपार्ह स्थितीत आढळलं जोडपं; गावकऱ्यांनी आधी व्हिडिओ बनवला आणि मग... यानंतर पाहुणे नाश्ता करू लागले. इतक्यात एक तरुणी गंगानगर पोलिसांसोबत या लग्नसमारंभात हजर झाली. तरुणीनं असे आरोप केले, की नवरदेवानं तिला धोका दिला असून आता तो दुसरं लग्न करत आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तरुणीनं याबाबत मेडिकल ठाणे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी लग्नमंडपात पाहून वरात्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. यादरम्यान मेडिकल पोलिसांनी नवरदेवासोबत आणखी काही जणांना अटक केली आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: