• Home
 • »
 • News
 • »
 • pune
 • »
 • सावधान! पुण्यात सेक्सटॉर्शनच्या प्रकरणांत वाढ; सोशल मीडियातून 275 पुरुषांना लाखोंचा गंडा

सावधान! पुण्यात सेक्सटॉर्शनच्या प्रकरणांत वाढ; सोशल मीडियातून 275 पुरुषांना लाखोंचा गंडा

सोशल मीडियावर फेक अकाऊंट बनवून त्यावर बनावट महिलेचा मादक फोटो लावत पुरुषांना ब्लॅकमेल केल्याचा प्रकरणांत वाढ झाली आहे. एकट्या पुण्यात तब्बल 275 पुरुषांना लाखो रुपयांना गंडा घालण्यात आला आहे.

 • Share this:
  पुणे, 29 जून: सोशल मीडियावर फेक अकाऊंट (Fake Account) बनवून त्यावर बनावट महिलेचा मादक फोटो लावत पुरुषांना ब्लॅकमेल (Blackmail) केल्याचा प्रकरणांत वाढ झाली आहे. मागील सहा महिन्यांत पुण्यातील तब्बल 275 पुरुषांना अशाप्रकारे गंडा (Online fraud) घालण्यात आला आहे. आरोपींनी विविध प्रकारचे सॉफ्टवेअर वापरून लोकांची फसवणूक करण्याचा धडाका सुरू केला आहे. आरोपींनी संबंधित पुरुषांचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ (Obscene photo and video) मागवून त्यांची फसवणूक केली आहे. याप्रकरणाचे धागेदोरे राजस्थानपर्यंत पोहोचले असून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पुण्यातील मुंढवा परिसरातील रहिवासी असणाऱ्या 32 वर्षीय व्यावसायिकाला अज्ञात आरोपींनी 18 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. आरोपींनी न्यूड व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ऑनलाइन खंडणी वसूल केली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी सांगितलं की, आरोपी फेसबुक, व्हॉट्सअॅप, स्क्रीन व्हिडीओ रेकॉर्डर, हाऊस मॉड्युलेटर सॉफ्टवेअर आणि वेगवेगळ्या यूपीआय अॅप्लिकेशन्सचा वापर करत तरुणांची लुट चालवली आहे. हेही वाचा-पतीकडे जाऊ नये म्हणून बापाने केलं कैद; Video Viral झाल्यानंतर सत्य उघड विशेष म्हणजे आरोपी हे पुरुष असून विविध तंत्रज्ञानाचा वापर करत महिला असल्याचा भास निर्माण करत आहेत. आरोपी बनावट फेसबुक अकाऊंट काढून त्यावर मादक महिलेचा खोटा प्रोफाइल तयार करतात. त्यानंतर विविध शहरातील लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. फोटो पाहून अनेकजण आरोपीच्या जाळ्यात अडकतात. यानंतर आरोपी महिला बनून तरुणांशी चॅटींग करतात. त्यानंतर मोबाइल नंबर मागतात. त्याचबरोबर आरोपी मॉड्युलेटर सॉफ्टवेअरचा वापर करत, पुरुषांचा आवाज महिलेच्या आवाजात रुपांतरित करतात आणि समोरच्या व्यक्तीला ऐकवतात. यामुळे समोरील व्यक्तीही त्यांच्यावर विश्वास ठेवतो. हेही वाचा-पुण्यात तरुणाचा मैत्रिणीवर बलात्कार; अश्लील VIDEO शाळेच्या ग्रुपवर केला व्हायरल यानंतर आरोपीनं विश्वास संपादन केल्यानंतर रात्री -अपरात्री अश्लील चॅटींग करत न्यूड फोटो किंवा व्हिडीओची मागणी करतात. यानंतर न्यूड व्हिडीओ हाती लागल्यानंतर आरोपी पैशाची मागणी करायला सुरूवात करतात. त्याचबरोबर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देतात. त्यामुळे बदनामीच्या भीतीनं अनेकजण त्यांची मागणी पूर्ण करतात. आरोपींनी मागील सहा महिन्यांत एकट्या पुण्यातील 275 पुरुषांना आर्थिक गंडा घातला आहे. आरोपींनी संबंधित पुरुषांकडून 15 ते 55 हजार रुपयापर्यंतची खंडणी वसुल केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अज्ञात व्यक्तींशी संवाद साधू नये. तसेच आपले वैयक्तिक फोटो अज्ञातांना पाठवू नये, असा सल्ला सायबर पोलिसांनी दिला आहे.
  Published by:News18 Desk
  First published: