मराठी बातम्या /बातम्या /ahmednagar /

माळशेज घाटात दरड कोसळून गाडीचा चुराडा; चहा प्यायला उतरल्यानं दोन जीवलग थोडक्यात बचावले

माळशेज घाटात दरड कोसळून गाडीचा चुराडा; चहा प्यायला उतरल्यानं दोन जीवलग थोडक्यात बचावले

मुसळधार पावसामुळे माळशेज घाटात काल सायंकाळी एका कारवर दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत कारचा चुराडा झाला असून दोन जीवलग थोडक्यात बचावले आहेत.

    कल्याण, 12 जून: मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाचा (rain in maharashtra) जोर वाढला आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. अशात मागील तीन दिवसांपासून माळशेज घाट (Malshej Ghat Rain) परिसरात मुसळधार पाऊस कोसळला आहे. मुसळधार पावसामुळे माळशेज घाटात दरवर्षी दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. अशीच एक घटना काल सायंकाळी घडली आहे. एका कारवर दरड कोसळल्याने कारचा चुराडा झाला आहे. पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अहमदनगर येथील रहिवासी असणारा मुकुंद बसवे हा तरुण काल आपल्या एका मित्रासह आपल्या वडिलांना आणण्यासाठी गाडीने कल्याणच्या दिशेने निघाला होता. सायंकाळी पाचच्या सुमारास दोघं गाडीनं माळशेज घाटात पोहोचले. याठिकाणी गेल्यानंतर चहाची तलफ आल्यानं त्यांनी आपली कार रस्त्याच्या कडेला पार्क केली अन् कारमधून उतरून चहाच्या दुकानाजवळ पोहोचले. तेवढ्यात अचानक घाटातील दरड कोसळली आणि चारचाकीचा पूर्णपणे चुराडा झाला. आणखी काही क्षण ते गाडीत बसून राहिले असते. तर मोठी जीवितहानी झाली असती. या दुर्घटनेत गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असलं. तर चहा पिण्यासाठी खाली उतरेला मुकुंद आणि त्याचा मित्र थोडक्यात बचावले आहेत. त्यामुळे काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, या म्हणीचा प्रत्यय दोघांना आला आहे. हे ही वाचा-मोठी बातमी: मुसळधार पावसामुळे चेंबूरमध्ये घरे कोसळली ही दरड कोसळल्यानंतर बघ्यांनी केलेली गर्दी वगळता, रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आणि बचाव दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. युद्ध पातळीवर काम करत काही वेळातच दरड हटवण्यात आली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Accident, Ahmednagar, Car crash

    पुढील बातम्या