मुंबई, 12 जून: दोन दिवसांपूर्वी मुंबईतल्या मालाडमध्ये (malad building collapse)मुसळधार पावसामुळे चार मजली इमारतीचा भाग कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आजच्या मुसळधार पावसामुळे चेंबूरमध्ये (Chembur) घरे कोसळण्याची घटना घडली आहे. (Mumbai Heavy Rain)
चेंबूरच्या लाल डोंगर परिसरात असलेल्या विश्व गौतम नगरमध्ये घरे कोसळली आहेत. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. काही वेळापूर्वी या ठिकाणी आधी एका घराची भिंत कोसळली. त्यानंतर ही भिंत एका बाजूच्या घरावर कोसळल्यानं ते संपूर्ण घर कोसळले आणि बाजूच्या एका घराचा ही मोठा भाग घेऊन खाली आले.
आजच्या मुसळधार पावसामुळे चेंबूरमध्ये घरे कोसळण्याची घटना घडली आहे. @News18lokmat pic.twitter.com/4ppebxF7I8
— News18Lokmat (@News18lokmat) June 12, 2021
यात एक तरुण अडकला होता. मात्र त्याला तात्काळ स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढले आहे. घटनास्थळी पालिकेचे कर्मचारी दाखल झाले असून मदतकार्य सुरू केले आहे.
चेंबूरच्या लाल डोंगर परिसरात असलेल्या विश्व गौतम नगरमध्ये घरे कोसळली @News18lokmat pic.twitter.com/UJ1HlBdx6T
— News18Lokmat (@News18lokmat) June 12, 2021
मालाड इमारत दुर्घटना
मुंबईत बुधवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर Heavy rain in Mumbai) मुसळधार पावसामुळे मालाडमधील एका चार मजली चाळीचा (Residential structures) काही भाग कोसळल्याची दुर्घटना घडली होती. मालाडच्या मालवणी भागात ही घटना घडली. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण गंभीर जखमी झाले.(Malad Building Collapsed) या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 6 मुलांसह 9 जणांचा करुण अंत झाला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुंबईतील मालाड पूर्व या ठिकाणी मालवणी गेट क्र. 8 येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात ही दुर्घटना घडली. या ठिकाणी एका 3 मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला बाजूला असलेल्या 1 मजली चाळीवर कोसळला. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.