अहमदनगर, 13 नोव्हेंबर : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील नेवासा शहरात (Nevasa City) एका व्यापाऱ्याला लुटल्याची घटना समोर आली आहे. बंदुकीचा धाक दाखवत आरोपींनी लुटण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आरोपींनी गोळीबारही केला आहे. ही संपूर्ण घटना परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (businessman robbed incident caught in cctv) नेवासा येथील खडका फाटा रस्त्यावर मार्केट कमिटी जवळील एका खाद्य तेल कंपनीच्या मालकाचा मुलगा निरज मुथा शुक्रवारी सायंकाळी पैशाची बॅग घेऊन कंपनी शेजारीच असलेल्या घरी जात होता. घराच्या गेटजवळ तो आला असता समोरच झुडपात दबा धरून बसलेल्या दोन चोरांनी पैशाची बॅग हिसकवण्याचा प्रयत्न केला. झटापटीत चोरांनी जवळील बंदुकीतून फायर करत 90 हजार रक्कम असलेली बॅग फरार झाले.
गोळीबार करुन पैशांनी भरलेली बॅग पळवली pic.twitter.com/tQzFdb1RVf
— News18Lokmat (@News18lokmat) November 13, 2021
सदरील घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र सुदैवाने गोळीबारात निरजला कुठलीही इजा झालेली नाही. सदरील घटना कळताच पोलिसांनी तात्काळ तपासाच्या दिशेने कर्मचाऱ्यांना सूचना करून परिसरात नाकाबंदी केली. परंतु चोरट्यांचा कुठलाही तपास लागला नाहीये. सदरची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलीस फुटेजच्या आधारे तपास करत आहेत. वाचा : पुण्यात दिवसाढवळ्या वृद्धाला लुटलं रिक्षातून 50 लाखांचे दागिने घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्याचा मित्राने केला घात एका सोनं-चांदीच्या व्यापाऱ्याला त्याच्याच जीवलग मित्राने तब्बल 50 लाखांना लुटल्याची धक्कादायक घटना जयपूर येथून समोर आली आहे. फिर्यादी व्यापारी काही रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने घेऊन रिक्षाने जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर, आरोपीनं कट रचून आपल्या जीवलग मित्राला लुटलं आहे. पण त्याचा हा बनाव फार काळ टिकला नाही. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. पण मुख्य सूत्रधार आणि आरोपी मित्र अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. संबंधित घटना राजस्थानातील जयपूर येथील आहे. फिर्यादी व्यापारी महेंद्र कुमार अग्रवाल हे सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे व्यापारी आहेत. 28 ऑक्टोबर रोजी पहाटे फिर्यादी अग्रवाल हे रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 50 लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन रिक्षातून जात होते. दरम्यान सहा ते सात जणांनी पहाटे रिक्षा अडवून अग्रवाल यांच्याकडून 50 लाखांचा ऐवज लुटला होता. लुटीच्या या घटनेनंतर अग्रवाल यांनी जयपूर पोलिसांत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी या घटनेचा बारकाईने तपास करत, जीवलग मित्राने रचलेल्या कटाचा पर्दाफाश केला आहे. नगरच्या लेखाधिकाऱ्यानं लाचखोरीतून कमवली लाखोंची मालमत्ता अहमदनगर महानगरपालिकेचा मुख्य लेखाधिकारी प्रवीण मानकर याला एका लाचखोरी प्रकरणात एसीबीने अटक केली आहे. लाचखोर मानकरला अटक केल्यानंतर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मानकर याच्या घराची झडती घेतली आहे. अधिकाऱ्यांनी मानकर याच्या घरातून साडेअकरा लाख रुपयांच्या रोकडसह 540 ग्रॅम सोनं आणि दीड किलो वजनाच्या चांदीच्या वस्तू आढळल्या आहे. आरोपीनं संबंधित सर्व मालमत्ता लाचखोरी मिळवली असल्याचा संशय अधिकाऱ्यांना आहे.