मराठी बातम्या /बातम्या /ahmednagar /

नगरच्या लेखाधिकाऱ्यानं लाचखोरीतून कमवली लाखोंची मालमत्ता; घरात 11 लाख रोकडसह आढळलं इतकं सोनं

नगरच्या लेखाधिकाऱ्यानं लाचखोरीतून कमवली लाखोंची मालमत्ता; घरात 11 लाख रोकडसह आढळलं इतकं सोनं

Crime in Ahmednagar: अहमदनगर महानगरपालिकेचा मुख्य लेखाधिकारी प्रवीण मानकर याला एका लाचखोरी प्रकरणात एसीबीने अटक केली आहे.

Crime in Ahmednagar: अहमदनगर महानगरपालिकेचा मुख्य लेखाधिकारी प्रवीण मानकर याला एका लाचखोरी प्रकरणात एसीबीने अटक केली आहे.

Crime in Ahmednagar: अहमदनगर महानगरपालिकेचा मुख्य लेखाधिकारी प्रवीण मानकर याला एका लाचखोरी प्रकरणात एसीबीने अटक केली आहे.

    अहमदनगर, 22 ऑक्टोबर: अहमदनगर महानगरपालिकेचा मुख्य लेखाधिकारी प्रवीण मानकर याला एका लाचखोरी प्रकरणात (Pravin mankar bribe case) एसीबीने (ACB) अटक केली आहे. लाचखोर मानकरला अटक केल्यानंतर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मानकर याच्या घराची झडती घेतली आहे. अधिकाऱ्यांनी मानकर याच्या घरातून साडेअकरा लाख रुपयांच्या रोकडसह 540 ग्रॅम सोनं आणि दीड किलो वजनाच्या चांदीच्या वस्तू आढळल्या आहे. आरोपीनं संबंधित सर्व मालमत्ता लाचखोरी मिळवली असल्याचा संशय अधिकाऱ्यांना आहे. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी मानकर याच्या पत्नीकडे चौकशी केली असता, तिला साडेअकरा लाख रुपयांच्या रोकडबाबत समाधानकारक उत्तरं देता आली नाहीत. एका ठेकेदाराला धनादेश देण्यासाठी मानकर याने 20 हजार रुपयांची लाच मागितली होती. याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळाल्यानंतर, एसीबीने सापळा रचून लाचखोर लेखाधिकारी प्रवीण मानकर याला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हेही वाचा-दिल्लीतील डॉक्टरला 2 कोटींचा चुना लावणाऱ्या तरुणाची आत्महत्या, यवतमाळमधील घटना आरोपी मानकरला ताब्यात घेतल्यानंतर, एसीबीचं एक पथक मानकर याच्या घरी झडती घेण्यासाठी दाखल झालं. यावेळी अधिकाऱ्यांना मानकर याच्या घरात साडे अकरा लाख रुपयांची रोख रक्कम, 540 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि दीड किलो चांदीच्या वस्तू सापडल्या आहेत. साडे अकरा लाख रुपयांच्या रोकडबाबत अधिकाऱ्यांनी मानकरांच्या पत्नीकडे चौकशी केली असता, त्यांना समाधानकारक उत्तरं देता आली नाहीत. हेही वाचा-सांगलीतील महिलेनं Amazonला घातला 28 लाखांचा गंडा; 5महिन्यांपासून करत होती फसवणूक गुरुवारी दुपारी तोफखाना पोलिसांनी अहमदनगर महानगरपालिकेचा मुख्य लेखाधिकारी प्रवीण मानकरला विशेष न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने शुक्रवारपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून तोफखाना पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ahmednagar, Crime news

    पुढील बातम्या