मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यात दिवसाढवळ्या वृद्धाला लुटलं; हजारो रुपयांची रोकड हिसकावून चोरटा फरार

पुण्यात दिवसाढवळ्या वृद्धाला लुटलं; हजारो रुपयांची रोकड हिसकावून चोरटा फरार

Crime in Pune: पुण्यातील बाजीराव रस्त्यावरील हुजूरपागा शाळेजवळ पीएमपी स्थानकावर उभ्या असलेल्या एका वयोवृद्ध व्यक्तीला दिवसाढवळ्या भामट्यानं लुटलं आहे.

  • Published by:  News18 Desk

पुणे, 13 नोव्हेंबर: पुण्यातील (Pune) बाजीराव रस्त्यावरील हुजूरपागा शाळेजवळ पीएमपी स्थानकावर उभ्या असलेल्या एका वयोवृद्ध व्यक्तीला दिवसाढवळ्या भामट्यानं लुटलं (Old man looted by unknown) आहे. पाठीमागून आलेल्या चोरट्यांनी 50 हजार रुपयांची रोकड असलेली पिशवी हिसकावून पळ काढला (Theft 50000 Rs) आहे. या पिशवीत बँकेची अन्य कागदपत्रदेखील होते. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

विश्रामबाग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 61 वर्षीय फिर्यादी व्यक्ती बुधवार पेठ परिसरात राहतात. गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास फिर्यादींनी बँकेतून 50 हजार रुपयांची रोकड काढली होती. त्यांच्याकडील 50 हजार रुपयांची रोकड आणि मुदत ठेवीची काही कागदपत्रं त्यांनी एका पिशवीत ठेवली होती. ही पिशवी घेऊन ते बाजीराव रस्त्यावरील हुजूरपागा शाळेसमोरील पीएमपी थांब्याजवळ थांबले होते.

हेही वाचा-औरंगाबाद: बलात्कार पीडितेला मदतीच्या बहाण्यानं लुटलं; 20 लाखांचा घातला गंडा

दरम्यान, फिर्यादींच्या पाठीमागून एक व्यक्ती आली, त्याने फिर्यादीला काही कळायच्या आत, त्यांच्या हातातील पैशाची पिशवी हिसकावली आणि पळ काढला. फिर्यादी वयोवृद्धानं आरडाओरडा करत लोकांकडे मदत मागितली. पण तोपर्यंत चोरटा पसार झाला होता. ही घटना घडताच फिर्यादी वयोवृद्धाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञात आरोपीविरोधात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा-बीड हादरलं! अल्पवयीन मुलीवर 400 जणांकडून बलात्कार, पोलिसानंही केलं लैंगिक शोषण

गुन्हा दाखल झाल्यानंतर, विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहाणी केली आहे. संबंधित परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही संशयास्पद हालचाली आढळतात का? याचा शोध घेतला जात आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय निकुंभ करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Pune, Theft