जयपूर, 12 नोव्हेंबर: एका सोनं-चांदीच्या व्यापाऱ्याला त्याच्याच जीवलग मित्राने तब्बल 50 लाखांना लुटल्याची (looted 50 lakh worth gold ornaments) धक्कादायक घटना समोर आली आहे. फिर्यादी व्यापारी काही रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने घेऊन रिक्षाने जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर, आरोपीनं कट रचून आपल्या जीवलग मित्राला लुटलं आहे. पण त्याचा हा बनाव फार काळ टिकला नाही. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक (6 accused arrested) केली आहे. पण मुख्य सूत्रधार आणि आरोपी मित्र अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. संबंधित घटना राजस्थानातील जयपूर येथील आहे. फिर्यादी व्यापारी महेंद्र कुमार अग्रवाल हे सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे व्यापारी आहेत. 28 ऑक्टोबर रोजी पहाटे फिर्यादी अग्रवाल हे रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 50 लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन रिक्षातून जात होते. दरम्यान सहा ते सात जणांनी पहाटे रिक्षा अडवून अग्रवाल यांच्याकडून 50 लाखांचा ऐवज लुटला होता. लुटीच्या या घटनेनंतर अग्रवाल यांनी जयपूर पोलिसांत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी या घटनेचा बारकाईने तपास करत, जीवलग मित्राने रचलेल्या कटाचा पर्दाफाश केला आहे. हेही वाचा- Pune: अंध पतीच्या डोळ्यात फेकली धूळ; 7 महिने संसार करत लाखोंचा घातला गंडा या प्रकरणी जयपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सहा जणांना अटक केली आहे. मुख्य आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपी सुनील आणि व्यापारी महेंद्र अग्रवाल हे दोघंही एकमेकांचे जीवलग मित्र आहेत. महेंद्र याने काही दिवसांपूर्वी सुनीलला 50 लाख रुपये उसनेही दिले होते. जिवलग मित्र असल्याने महेंद्र कुठे जातो, काय करतो याची सर्व माहिती सुनीलला असायची. दरम्यान 26 ऑक्टोबर रोजी फिर्यादी महेंद्र सोन्याचांदीचे दागिने घेऊन बिकानेरला गेले होते. हेही वाचा- मित्राच्या वाढदिवसाला गेले अन्..; दुर्दैवी घटनेत जीवलगानं डोळ्यादेखत सोडला प्राण पण, सर्व दागिनं विकले गेले नाहीत म्हणून ते 27 ऑक्टोबरला रात्री बिकानेर येथून जयपूरकडे रवाना झाले होते. यावेळी महेंद्र याचं सुनीलसोबत मोबाइलवर बोलणंही झालं होतं. याच माहितीच्या अधारे सुनीलनं आपल्या मित्राला लुटण्याचा कट रचला. महेंद्र दुसऱ्या दिवशी पहाटे जयपूरला पोहोचणार त्यानंतर रिक्षाने घरी जाणार अशी माहिती आरोपीला मिळाली होती. महेंद्र हे 50 लाखांचा ऐवज घेऊन रिक्षात बसले असता, त्याठिकाणी आलेल्या गुंडानी महेंद्र यांच्याकडील बॅग पळवली. आरोपीनं संबंधित सहा गुंडांना नऊ लाखांची रक्कम देत, बाकीचा मुद्देमाल घेऊन पळ काढला आहे. पोलीस सुनीलचा शोध घेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.