अहमदनगर, 14 नोव्हेंबर: राज्याचे उपमुख्यमंत्री (Deputy CM) अजित पवार (ajit pawar) यांनी काल अहमदनगर (ahmednagar) जिल्ह्यातल्या आमदार रोहित पवार (rohit pawar) यांचा मतदारसंघ असलेल्या कर्जत आणि जामखेड तालुक्यात हजेरी लावली होती. यावेळी तिथे गेल्यानंतर कोणीच मास्क घातला नव्हता. यावरुन अजित दादांनी पहिल्यांदा आमदार रोहित पवार यांना फटकारलं.
अजित पवार कोरोनाच्या काळात मास्क आणि इतर आवश्यक ती काळजी घेतात. ते नेहमीच सतर्क असतात. कोणत्याही कार्यक्रमात गेल्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर ते काळजी घेतात. तसंच आजूबाजूच्या लोकांनाही मास्कचा वापर करा अस सांगतात.
पुढील काळात खर्ड्याचा किल्ला, संत श्री गितेबाबा, संत श्री सिताराम बाबा आणि निंबाळकर वाडा इथल्या विकास आराखड्यास मंजुरी दिली जाईल आणि टप्प्याटप्प्याने ही कामं पूर्ण केली जातील, असं आश्वासन यावेळी अजितदादांनी दिलं. pic.twitter.com/ftZmpTSQNJ
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 13, 2021
काल अजितदादांनी रोहित पवार यांना मास्क न वापरण्यावरुनच फटकारलं आहे. रोहितला मी म्हणलो, अरे शहाण्या.. तू आमदार आहेस. तू मास्क वापरलास तर मला इतरांना सांगता येईल. मी भाषण करताना मास्क काढत नाही आणि लोक मास्क वापरत नाहीत, हे बरोबर नाही असं अजित पवार म्हणाले.
'रोहितला काम करू द्या, तुम्ही गप्प गुमान बसा' अजितदादांनी भाजप नेत्याला फटकारले
यावेळी अजितदादांनी रोहित पवारांच्या कामाचं कौतुक करत 'रोहित पवार काम करतोय त्याला करू द्या आणि तुम्ही गप्प गुमान बसा' असा सल्ला वजा टोलाच अजितदादांनी भाजपचे नेते राम शिंदे (ram shinde) यांना लगावला. काल अहमदनगर जिल्ह्यातल्या आमदार रोहित पवार यांचा मतदारसंघ असलेल्या कर्जत आणि जामखेड तालुक्यात विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला.
हेही वाचा- क्रिकेट विश्व गाजवणारी टीम इंडियाची त्रिमूर्ती एकत्र, आता सचिनच्या इनिंगची सर्वांना प्रतीक्षा
या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम विकास मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील आमदार आणि नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
'फडणवीस यांनी जामखेड येथे येऊन पिण्याच्या पाण्याची योजना तत्त्वतः मंजूर केल्याचे सांगितले होते. मात्र ही योजना अद्याप पूर्ण झाली नसल्याने योजना तत्त्वतः म्हणजे काय? असा सवाल करत योजना मंजूर करायची असते, अशी टीका अजित पवारांनी केली. यावेळी अजित पवार यांनी माजी आमदार राम शिंदे यांना देखील टीकेचे लक्ष केले. 'राम शिंदे यांना झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे लोकांनी तुम्हाला का नाकारले याचा विचार करा आणि आत्मपरीक्षण करा. रोहित काम करतोय त्याला करू द्या आणि तुम्ही गप्प गुमान बसा', असा सल्लावजा टोलाही पवारांनी लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, Rohit pawar