मराठी बातम्या /बातम्या /ahmednagar /

प्रीतम मुंडेंना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न दिल्याचा भाजपला जबरदस्त फटका; बीड ते जालना, नगर पुण्यापर्यंत राजीनाम्याची लाट

प्रीतम मुंडेंना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न दिल्याचा भाजपला जबरदस्त फटका; बीड ते जालना, नगर पुण्यापर्यंत राजीनाम्याची लाट

Pritam Munde: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात (Cabinet expansion) बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आलं. याचे पडसाद आता उमटताना दिसत आहे.

Pritam Munde: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात (Cabinet expansion) बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आलं. याचे पडसाद आता उमटताना दिसत आहे.

Pritam Munde: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात (Cabinet expansion) बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आलं. याचे पडसाद आता उमटताना दिसत आहे.

  • Published by:  Pooja Vichare

अहमदनगर, 11 जुलै: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात (Cabinet expansion) बीडच्या खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना डावलण्यात आलं. याचे पडसाद आता उमटताना दिसत आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर मी आणि प्रीतम दोघेही नाराज नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र दुसरीकडे मुंडे समर्थकांनी (Munde supporters resign) राजीनामा अस्त्र बाहेर काढले आहे. बीड, पिंपरी चिंचवड नंतर या राजीनाम्याचं सत्र अहमदनगर (Ahmednagar) मध्ये ही पोहोचलं आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी (Pathardi) पंचायत समितीच्या सभापती आणि जिल्हा उपाध्यक्ष यांनी राजीनामे देत नाराजी व्यक्त केली आहे. अहमदनगरमध्येही दोघांनी राजीनामे दिला आहे. मुंडे भगिनींच्या समर्थक असलेल्या पाथर्डी पंचायत समितीच्या भाजपच्या सभापती सुनीता दौंड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी सुद्धा आपल्या राजीनामा दिल्याचं समजतंय. या दोघांनीही भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे राजीनामे सोपवले आहेत.

प्रीतम मुंडे समर्थनार्थ "ना"राजीनामा सत्राचा लोण जालन्यापर्यंत

जालन्यातही भाजप युवा मोर्चा जिल्हा संयोजिका आश्विनी आंधळे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. भाजप ओबीसी मोर्चा अंबड तालुकाध्यक्ष ईशवर घाईत यांनी ही राजीनामा दिला असून मुंडे समर्थनार्थ आणखीन अनेक कार्यकर्ते राजीनाम्याच्या तयारीत असल्याचं समजतंय.

हेही वाचा- माजी वनमंत्री मंत्रिमंडळात कमबॅक करणार? स्वतः संजय राठोड यांनी दिली प्रतिक्रिया

बीडमध्येही राजीनाम्याची लाट

बीड भाजपमध्ये राजीनामा (resignation) सत्र सुरू आहे. आतापर्यंत एकूण 36 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. भाजपच्या 11 तालुका अध्यक्षांनंतर आता जिल्हा परिषदेच्या तीन सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. संतोष हांगे, सारिका राणा डोईफोडे, रामराव खेडकर या जिल्हा परिषदेच्या तीन सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. यासोबतच स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राणा डोईफोडे यांनीही राजीनामा दिला आहे. आत्तापर्यंत 36 पदाधिकारी यांनी राजीनामे दिले आहेत. या राजीनामा सत्रांमुळे एकच खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत सदस्यांपासून जिल्हा पदाधिकारी यांच्यात तीव्र नाराजी आहे. तसेच पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे समर्थकांमध्ये संतापची लाट आहे.

हेही वाचा- तणाव वाढणार! स्वबळाचा नारा देत नाना पटोलेंची पुण्याच्या पालकमंत्र्यांवर टीका

पिंपरी चिंचवडमध्येही (Pimpri Chinchwad) राजीनामा

पिंपरी चिंचवड शहर ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष दत्ता कायंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. प्रीतम मुंडे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तरात समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांचा कट्टर समर्थक म्हणून आपण राजीनामा दिला असं कायंदे यांनी स्पष्ट केलं. त्यांनी आपला राजीनामा पिंपरी चिंचवडचे ओबीसी मोर्चा अध्यक्ष भाऊसेठ रासकर यांच्याकडे सुपुर्द केला आहे.

First published:

Tags: BJP, Pankaja munde, Union cabinet