मराठी बातम्या /बातम्या /aurangabad /

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच निर्णय घेतील, मंत्रिमंडळातील पुनरागमनावर संजय राठोड यांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच निर्णय घेतील, मंत्रिमंडळातील पुनरागमनावर संजय राठोड यांची प्रतिक्रिया

Sanjay Rathore Reaction:शिवसेना आमदार संजय राठोड हे पुन्हा मंत्रिमंडळात सामील होण्याचे संकेत मिळताहेत. स्वतः संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Rathore Reaction:शिवसेना आमदार संजय राठोड हे पुन्हा मंत्रिमंडळात सामील होण्याचे संकेत मिळताहेत. स्वतः संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Rathore Reaction:शिवसेना आमदार संजय राठोड हे पुन्हा मंत्रिमंडळात सामील होण्याचे संकेत मिळताहेत. स्वतः संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

औरंगाबाद, 11 जुलै: पूजा चव्हाण (Pooja Chavan Suicide Case) आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे नेते संजय राठोड (Sanjay Rathore) यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दरम्यान शिवसेना आमदार संजय राठोड हे पुन्हा मंत्रिमंडळात सामील होण्याचे संकेत मिळताहेत. कालच शिवसेनेचे नेते (Shivsena) आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी यांचे संकेत दिलेत. उदय सामंत म्हणाले की, संजय राठोड यांच्या कामाची पद्धत पाहता त्यांच्यासारख्या नेत्याची गरज आहे, लवकरच ते मंत्रिमंडळात सामील होतील. उदय सामंताच्या वक्तव्यावर स्वतः संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माझ्या मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील, असं संजय राठोड यांनी स्पष्ट केलं. सध्या संजय राठोड हे औरंगाबादच्या दौऱ्यावर असून त्यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला. टीव्ही 9 मराठीनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

मी सध्या संभाजीनगरचा दौरा करत आहे. माझ्या समाजातील आणि भटक्या समाजातील बांधवाना भेटत आहे. त्यांचे प्रश्न सोडवण्याचा माझा प्रश्न आहे. माझ्या मंत्रीपदाबद्दल मला काही बोलायचं नाही. मला त्याबद्दल काहीही बोलायचं नाही, याबाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेतील, असं राठोड यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा- तणाव वाढणार! स्वबळाचा नारा देत नाना पटोलेंची पुण्याच्या पालकमंत्र्यांवर टीका

माझ्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाबाबत उदय सामंत यांनी वक्तव्य केलं आहे. मी त्यांची प्रतिक्रिया ऐकलेली नाही. ते माझे स्नेही आहेत. ते बोलले. पण त्याबद्दल त्यांनाच अधिक विचारलं पाहिजे. मी काही बोलू शकत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते उदय सामंत

संजय राठोड (Sanjay Rathore) यांना मंत्रिपद सोडावे लागले होते. पण, त्यांची कामाची पद्धत पाहता त्यांच्यासारख्या नेत्याची गरज आहे, लवकरच ते मंत्रिमंडळात सामील होतील, असं सूचक विधान उदय सामंत यांनी केलं होतं. संजय राठोड हे मंत्रिपदावरून पायउतार झाले आहे. बंजारा समाजाचे ते मोठे नेते आहे. त्यांची कार्यशैली ही उत्तम आणि धडाडीची होती. त्यामुळे अशा नेत्यांची शिवसेनेला गरज आहे. या प्रकरणातून त्यांची सुटका झाल्यास लवकरच ते मंत्रिमंडळात येतील, असं उदय सामंत म्हणाले.

First published:

Tags: Sanjay rathod, Sanjay rathod resign, Shivsena