मराठी बातम्या /बातम्या /ahmednagar /अचानक साप दिसला अन् काळजाचा ठोका चुकला; नगरमध्ये कड्यावरून कोसळून मुलाचा मृत्यू

अचानक साप दिसला अन् काळजाचा ठोका चुकला; नगरमध्ये कड्यावरून कोसळून मुलाचा मृत्यू

नगरमध्ये डोंगराच्या उंच कड्यावरून कोसळून एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे. (प्रातिनिधीक फोटो)

नगरमध्ये डोंगराच्या उंच कड्यावरून कोसळून एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे. (प्रातिनिधीक फोटो)

अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील घोरपाडवाडी येथील डोंगराच्या उंच कड्यावरून कोसळून (falling off a cliff) एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अहमदनगर, 16 ऑगस्ट: अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील घोरपाडवाडी येथील डोंगराच्या उंच कड्यावरून कोसळून (falling off a cliff) एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू (Death) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कड्यावरून कोसळल्यानं संबंधित मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत (Injured in Head) झाली होती. त्याच्या काही मित्रांनी त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं मात्र याठिकाणी चार दिवस उपचार घेतल्यानंतर चिमुकल्याची प्राणज्योत मालवली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

संबंधित मृत पावलेल्या 12 वर्षीय मुलाचं नाव किसन गावंडे असून तो अकोला तालुक्यातील धामणगाव आवारी गावातील रहिवासी आहे. अपघाताच्या दिवशी किसन आपल्या काही मित्रांसोबत घोरपडवाडी परिसरात शेळ्या चारण्यासाठी गेला होता. सर्व मुलं शिवनदी कडा परिसरात पायवाटेनं शेळ्या घेऊन जात होते. दरम्यान संबंधित मुलांमधील एका अचानक भलामोठा साप दिसला. सापाला पाहुन सर्व मुलांची घाबरगुंडी उडाली.

हेही वाचा-2014 मध्ये सख्खा मुलगा, 2021 मध्ये सावत्र; ही आई करते मुलांची हत्या

त्यामुळे त्यांनी रस्ता मिळेल्या त्या दिशेनं पळायला सुरुवात केली. पण आपण यावेळी दुर्गम आणि अत्यंत अवघड ठिकाणी आहोत, याचा विसर या मुलांना पडला. यातच सापाला घाबरून मागे पळाल्यानं किसनचा पाय घसरला आणि तो कड्यावरून थेट दरीत कोसळला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही घटना घडल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला त्वरित घरी आणलं. पण किसनची प्रकृती गंभीर असल्यानं त्याला नाशकातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

हेही वाचा-चिकन शिजवण्यासाठी गॅसवर ठेवलं पाणी, काही वेळात त्यात उकळताना दिसली स्वतःची मुलगी

याठिकाणी चार दिवस उपचार घेतल्यानंतर 12 वर्षीय किसनची प्राणज्योत मालवली आहे. डोंगराच्या कड्यावर थेट दरीत कोसळल्यानं किसनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. अनेक प्रयत्न करूनही डॉक्टरही त्याला वाचवू शकले नाहीत. किसनच्या मृत्यूची बातमी समोर येताच, गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

First published:
top videos

    Tags: Accident, Ahmednagar