मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

2014 मध्ये सख्खा मुलगा, 2021 मध्ये सावत्र; ही आई करते मुलांची हत्या, गोणीत भरून फेकला मृतदेह

2014 मध्ये सख्खा मुलगा, 2021 मध्ये सावत्र; ही आई करते मुलांची हत्या, गोणीत भरून फेकला मृतदेह

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रतिकात्मक छायाचित्र

Murderous Mother: गुजरातमधील (Gujrat) अहमदाबादमध्ये एकाच आठवड्यात ही दुसरी घटना आहे, जिथे एका आईने मुलाची हत्या केली.

  • Published by:  Meenal Gangurde
अहमदाबाद, 15 ऑगस्ट :  48 वर्षांच्या एका महिलेने आपल्या 21 वर्षीय सावत्र मुलगा हार्दिक पटेल याची गळा आवळून हत्या केली. मुलाची हत्या (Murder) केल्यानंतर त्याचा मृतदेह एका गोणीत भरून अहमदाबमधील दस्करोई तालुक्यातील कुंजड गावात फेकून दिला. गुजरातमधील (Gujrat) अहमदाबादमध्ये एकाच आठवड्यात ही दुसरी घटना आहे, जिथे एका आईने मुलाची हत्या केली. (Murderous Mother) हार्दिकचा लहान भाऊ उमंग पटेल कांभा भागात डेअरी चालवतो. त्यांने प्राथमिक जबाबात सांगितलं की, गौरी आणि हार्दिक नेहमी पैशांवरुन भांडण करीत होते. माझी सावत्र आई आमच्या डेअरी व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या नावाखाली नातेवाईक आणि वडिलांच्या मित्रांकडून पैसे उधार घेत होती. मात्र हे पैसे तिने कधीच डेअरीसाठी खर्च केले नाही. उमंगने आरोप केला आहे की, गौरीने असं करीत करीत नातेवाईकांकडून 25 लाख रुपयांची उधार घेतली होती. हार्दिकला कोरोना, लॉकडाऊन आणि कर्फ्यूमुळे डेअरी व्यवसायाला नुकसानाचा सामना करावा लागला. जेव्हा या नातेवाईकांनी पैसे परत मागितले तेव्हा नेमका प्रकार समोर आला. ( step mother killed the child in gujrat) हे ही वाचा-Pune : लग्नसमारंभात जास्त हळद लावण्यावरुन पती-पत्नीमध्ये वाद; एकाचा गेला जीव मंगळवारी सकाळी हार्दिक घरात एकटा झोपलेला होता. आणि उमंग डेअरीवर होता. गौरीने नाशिकमधील आपले तीन नातेवाईक संजय, अनिल, दिनेश यांच्यासह मिळून हार्दिकचा गळा आवळला. यानंतर त्यांनी त्याचा मृतदेह एका गोणीत घातला आणि फेकून दिला, अशी माहिती येथील पोलिसांनी दिली आहे. उमंग जेव्हा घरी परतला तेव्हा रात्री उशिरा हार्दिक घरी परतना नाही म्हणून त्याने गौरीकडे याबाबत विचारणा केली. मात्र तिने स्पष्ट उत्तर दिलं नाही. यावेळी त्याने शेजारच्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की, गौरीचे तीन नातेवाईक एका गोणीत काही तरी भरून घेऊन जात होते. यानंतर पोलिसांना कांभा येथील झाडाझुडपांमध्ये एक मृतदेह सापडला आणि हा हार्दिकच होता. या प्रकरणात गौरीची चौकशी केल्यानंतर तिने आपल्या तीन नातेवाईकांची नावं सांगितली. यावेळी गौरीने आणखी एक धक्कादायक माहिती दिली. जेव्हा ती 2014 मध्ये नाशिकमध्ये काम करीत होती, तेव्हा तिने आपल्या 11 वर्षांच्या मुलाचीही हत्या केली होती. यावेळी पोलिसांना खोटं कारणं सांगून ती यातून सुटली होती. त्यानंतर 2015 मध्ये तिचं दुसरं लग्न हार्दिकच्या वडिलांसोबत झालं.

First published:

Tags: Crime news, Mother, Murder

पुढील बातम्या