Home /News /agriculture /

Jayant Patil : 'पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी उगाचच समृद्ध बनला नाही, त्यांचा विदर्भाने आदर्श घ्यावा'

Jayant Patil : 'पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी उगाचच समृद्ध बनला नाही, त्यांचा विदर्भाने आदर्श घ्यावा'

पश्चिम महाराष्ट्रात उपसा सिंचन योजना (Irrigation Scheme), पाणी पुरवठा योजना तसेच साखर कारखान्यांच्या पाणी योजना (Water schemes of sugar factories) यामुळे शेती मोठ्या प्रमाणावर प्रगत झाली आहे.

  सांगली, 29 मे : पश्चिम महाराष्ट्रात ऊस पिकासोबत (western Maharashtra farmer) शेतकरी विविध पिके घेत असतो. पश्चिम महाराष्ट्रात उपसा सिंचन योजना (Irrigation Scheme), पाणी पुरवठा योजना तसेच साखर कारखान्यांच्या पाणी योजना (Water schemes of sugar factories) यामुळे शेती मोठ्या प्रमाणावर प्रगत झाली आहे. याचा आदर्श राज्यातील तसेच विदर्भातील शेतकऱ्यांनी घ्यायला हवा असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil) यांनी केले आहे. विदर्भातील (Vidarbha farmers) काही शेतकरी राजारामबापू कारखान्यास भेट देण्यास आले होते त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली.

  यावेळी मंत्री पाटील म्हणाले कि, ऊसाची शेती किती उत्तमरित्या करता येते याचे उदाहरण म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आहे. या भागातील शेतकरी हा स्वबळावर समृध्द झाला आहे. स्वत: कष्ट करुन व कर्जे काढून शेतीसाठी पाण्याची व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर शासनाने टेंभू, ताकारी, म्हैसाळ यासारख्या उपसा सिंचन योजना राबवून जास्तीत जास्त शेती ओलिताखाली आणल्याचे पाटील म्हणाले.

  हे ही वाचा : Heatstroke Jalgoan : उन्हाचा फटका, जळगावात उष्माघाताने एकाचा मृत्यू

  पश्चिम महाराष्ट्रात पाण्याची उपलब्धता मोठी असली तरी या भागातील शेतकऱ्यांनी आधुनिक पध्दतीने शेती करण्यास नेहमीच प्राधान्य दिले आहे. कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यात ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. त्याचबरोबर यांत्रिक शेतीलाही प्राधान्य देऊन उत्तम दर्जाची शेती केली आहे. दरम्यान विदर्भात गोसीखुर्द प्रकल्पामुळे उपलब्ध झालेल्या पाण्याचा विनियोग विदर्भातील शेतकऱ्यांनी योग्य पध्दतीने करावा तसेच पिक पध्दतीमध्ये सुधारणा करण्याचे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

  पश्चिम महाराष्ट्रात उपसा सिंचन योजना, पाणी पुरवठा योजना तसेच साखर कारखान्यांच्या पाणी योजना यामुळे शेती मोठ्या प्रमाणावर प्रगत झाली आहे. या बाबींचा दौऱ्यातील शेतकऱ्यांनी अभ्यास करुन त्याप्रमाणे आपल्या भागात बदल घडविण्यासाठी प्रयत्न करावेत. पश्चिम महाराष्ट्रातील केवळ एक शेतकऱ्याचे हित न जोपासता सामुदायीकपणे सिंचन योजना राबविण्यास प्राधान्य दिले आहे. 

  हे ही वाचा : Bee Keeping : मुंबई-पुण्यातही मधमाशी पालनाचा व्यवसाय करता येणार, घरबसल्या असे मिळवा आर्थिक फायदे

  याचबरोबर शेतकऱ्यांनी परस्परात योग्य संवाद ठेवला आहे. सिंचन योजना योग्य पध्दतीने चालविल्या या योजनांची पाणीपट्टी, देखभाल दुरुस्ती खर्च संस्थांना वेळेत भरुन त्या सक्षम ठेवण्यास मदत केली. त्यामुळे आज या भागाचे नंदनवन झाले आहे. शेतीतील प्रगतीमुळे या भागातील शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावले असल्याचे पाटील म्हणाले.

  सांगली जिल्ह्यात ऊस शेतीबरोबरच येथील कष्टकरी शेतकऱ्यांनी द्राक्ष, डाळिंब अशा फळबागा मोठ्या प्रमाणात उभ्या केल्या, त्याचबरोबर आता आंबाही मोठ्या प्रमाणात घेतला जात आहे. तसेच शेतीमध्ये नवनविन प्रयोगही येथील शेतकरी करत असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, विदर्भातून अभ्यास दौऱ्यावर आलेल्या शेतकऱ्यांनी या सर्व गोष्टींची बारकाईने पाहणी करावी. तसेच तज्ञ शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी देऊन ते राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती घ्यावी. असे पाटील म्हणाले.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Farmer, Jayant patil, Vidarbha, Water Pumps .

  पुढील बातम्या