Home /News /agriculture /

Bee Keeping : मुंबई-पुण्यातही मधमाशी पालनाचा व्यवसाय करता येणार, घरबसल्या असे मिळवा आर्थिक फायदे

Bee Keeping : मुंबई-पुण्यातही मधमाशी पालनाचा व्यवसाय करता येणार, घरबसल्या असे मिळवा आर्थिक फायदे

राज्यातील ग्रामीण भागात मधमाशी पालनाचा (Bee keeping business) मोठा व्यवसाय केला जातो. दरम्यान राज्यातील मोठ्या शहरातही टेरेसमध्ये मधमाशी पालनाचा व्यवसाय केला जात आहे.

  मुंबई, 29 मे : सध्या राज्यातील ग्रामीण भागात मधमाशी पालनाचा (Bee keeping business) मोठा व्यवसाय केला जातो. राज्यातील बहुतेक ग्रामीण भागात मधमाशी पालन शेतीला (bee keeping farm) जोडधंदा म्हणून केला जाते. परंतु मधमाशी पालन हा व्यवसाय आता ग्रामीण भागासह शहरी भागातही केला जात आहे. तोही टेरेस गार्डन (Terrace garden) प्रमाणे बंगल्यांच्या गच्चीवर करता येतो. मधमाशी पालन करताना मधमाश्या डंख करतात म्हणून या व्यवसायाकडे जास्त लोक वळत नव्हते परंतु आता डंखहीन मधुमक्षिका पालन करता येणार आहे. मुंबई पुण्यासारख्या (Mumbai pune bee keeping) ठिकाणी हे अगदी सहज शक्य असल्याचे समोर आहे आहे. याचा यशस्वी प्रयोगही पुण्यात झाला आहे.

  मुंबई -पुण्यात सोसायट्या आणि बंगल्याच्या टेरेसवर पुरेशी जागा नसल्याने कुंड्यांमध्ये फुलांची झाडे, फळांची झाडे, भाजीपाला लावला जातो. तर काही लोक बाल्कनीत तुळस, सब्जा अशा औषधी वनस्पती आणि फुलझाडे लावतात. या सर्व प्रकारच्या वनस्पतींच्या फुलांमधील मध गोळा करण्याचे काम डंखहीन मधमाश्या करत असतातत. डंखहीन मधमाश्या फक्त मध गोळा करण्याचे काम करत असल्याने त्या कधीही चावत नाहीत. यापासून कोणालाही धोका पोचत नाही, अशी माहिती 'बी बास्केट' संस्थेचे अध्यक्ष अमित गोडसे यांनी लोकसत्ताला दिली. या संस्थेद्वारे पोयच्या मधुमक्षिकावर प्रयोग करण्यात येत आहे.

  हे ही वाचा : Monsoon Update: आला रे आला! केरळमध्ये मान्सून दाखल, राज्यातही Rain Alert जारी

  या मधमाश्या तुळशीची मंजिरी, गॅलरीत लावलेली विविध फुले, टेरेसवरील फुले आणि पालेभाज्यांच्या फुलांवर बसून त्या फुलांमधील मध गोळा करण्याचे काम करत असतात. मधमाश्यांमुळे गच्चीवर आणि बगिच्यांमध्ये परागीकरण मोठ्या प्रमाणात होते. परिणामी तेथील भाजीपाला उत्पादनात वाढ होते. असे आपल्या ठिकाणी प्रकल्प करण्यासाठी इच्छुकांना ८३०८३००००८ या क्रमांकावर संपर्क साधता येईल असेही गोडसे म्हणाले.

  दरम्यान यातून आपल्याला आर्थीक फायदाही आहे डंखहीन मधमाश्यांच्या एका पेटीपासून वर्षाला ३०० ते ५०० ग्रॅम शुद्ध मध मिळतो. त्यामुळे मधुमक्षिका पैदास करून सोसायट्यांना आर्थिक उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करता येणार असल्याचे गोडसे यांनी लोकसत्ताशी बोलताना माहिती दिली.

  हे ही वाचा : Big News: 22 प्रवाशांना घेऊन जाणारं नेपाळचं विमान रडारवरुन Missing, प्रवाशांमध्ये 5 भारतीय

  आपल्याला आयुर्वेदिकदृष्ट्या औषधी मूल्य असलेल्या ज्या प्रकारच्या वनस्पतींचा मध हवा आहे, त्या प्रकारची औषधी झाडे आपल्या टेरेसवर लावून हव्या त्या प्रकाराचा मध तयार करता येतो. मधमाश्या औषधी वनस्पतींच्या फुलांमधील मध शोषण करून पेटीमध्ये एकत्रित करतात. त्याद्वारे दर्जेदार, आपल्याला आवश्यक असणारा आणि त्या त्या औषधी झाडपाल्याचा मध आपल्याला सहजपणे या मधुमक्षिकांद्वारे संकलित करता येतो. शहरांतील पर्यावरणाच्या संवर्धनात मधुमक्षिका मोठे योगदान देऊ शकतात, सोसायट्या, बंगल्यांमध्ये मधुमक्षिकांचे पालन झाल्यास शहरी पर्यावरणाला मोठा हातभार लागणार आहे. सोसायटय़ांना उत्पन्नाचा नवा मार्ग मिळणार असल्याचे अमित गोडसे म्हणाले.

  भारतामध्ये नैसर्गिक अधिवासात पोयाच्या मधमाश्या म्हणजेच डंखहीन मधमाश्या सापडतात. पोयाच्या माश्यांचा आकार खूप लहान असल्यामुळे या माश्या आंबा, टोमॅटो अशा अगदी छोटय़ा आकाराच्या फुलांमध्ये देखील सहजगत्या प्रवेश करू शकतात. या माश्यांनी निर्माण केलेला मध हा अतिशय औषधी आणि उत्कृष्ट प्रतिचा समजला जातो.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Farmer, Mumbai, Pune

  पुढील बातम्या