पुणे, 25 नोव्हेंबर : केशर म्हंटलं की सगळ्यांना काश्मीर आठवतं. काश्मीरचं हवामान केशरला मानवतं. पण, त्यामुळे देशातल्या अन्य भागात हे पिक चांगलंच महाग आहे. एका पुणेकर तरुणानं चक्क पुणे शहरात केशरची शेती करायची ठरवली. त्याचा हा प्रयोग यशस्वी देखील झालाय. पुणे शहरातील वारजे भागात हा तरूण केशरची शेती करतोय. त्यानं केशर शेतीचा एक हंगाम यशस्वीपणे पूर्ण केला आहे.
विना मातीची शेती!
पुणे शहरातल्या वारजे भागात केशरची शेती कशी शक्य आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण, या तरुणानं त्या प्रश्नाचं उत्तर शोधलं. त्यापद्धतीने प्रशिक्षण घेतलं आणि मग प्रयोगाला सुरूवात केली. त्यानं मातीशिवाय शेतीचा प्रयोग यशस्वी केलाय. तो चक्क आठ बाय पाचच्या कंटेनरमध्ये ही शेती करत आहे.
शैलेश मोडक असं या प्रयोगशील शेतकरी तरूणाचं नाव आहे. शैलेश कॉम्पूटर सायन्समध्ये मास्टर्स केलंय. त्यानंतर तो सॉफ्टवेअर कंपनीत कामाला होता. त्यानं विदेशातही नोकरी केलीय. या चाकोरीबद्ध सुरक्षित आयुष्यात त्याचं समाधान होत नव्हतं. त्यामुळे त्यानं नोकरीचा राजीनामा देऊन खादी ग्रामोद्यागाचा मधमाशी पालनाचा कोर्स केला.
वयाच्या 23 व्या वर्षी केली शेतीत क्रांती, अनोख्या संकल्पनेमुळे मिळाला पुरस्कार
शैलेशनं मधमाशांच्या साठपेट्या घेऊन त्या शेतकऱ्यांना भाडेतत्वावर देण्यास सुरूवात केली. शेतीतज्ज्ञ डॉ. विकास खैरे यांच्याकडे त्यानं प्रशिक्षण घेतलं. त्या प्रशिक्षणानंतर तो शेतीमध्ये आधुनिक प्रयोग सुरू केले.
काय आहे प्रयोग?
शैलेशनं 8 बाय 5 च्या कंटेनरमध्ये हे सर्व प्रयोग केलेत. त्यानं 1 एकर शेतीमध्ये होतील तेवढे सर्व पिकं त्यामध्ये घेतले. याच प्रयोगाचा पुढील टप्पा म्हणून त्यानं केशरची लागवड केली. काश्मीरमध्ये होणाऱ्या केशरला जगभरातून चांगली मागणी असते. त्याची प्रतीग्रम 300 ते 1500 रूपयापर्यंत विक्री होते. त्याच्या दर्जानुसार केशरचा भाव बाजारात असतो.
शैलेशनं 320 स्केवर फुट कंटनेरमध्ये केशरची लागवड केली. एअरपोनिक पद्धतीनं त्यानं त्याच्या शेतीमध्ये प्रयोग केला आहेत. परदेशी भाज्या, मसाले यांना पर्याय म्हणून त्यानं केशर घेण्याचं ठरवलं. त्यानं प्राथमिक प्रयोगासाठी काश्मीरमधून बारा किलो केशरचे कंद मागवले. त्यानतंर या कंदाच्या वाढीसाठी नियंत्रित पध्दतीने कंटेनरमध्ये तापमान ठेवले.
दुष्काळी भागातील भावंडांची कमाल, 5 वर्षांमध्ये माळरानावर फुलवली वनराई! पाहा Video
कंटेनरमध्ये तापमान नियंत्रित करण्याकरता एअर सर्क्युलेटर, चिलर, एसी तसंच आद्रता कमी - जास्त करण्यासाठी आवश्यक अशा वेगवेगळ्या यंत्रणेचा वापर केला असल्याची माहिती शैलेशनं दिली. का ट्रेमध्ये आकारानुसार चारशे ते सहाशे कंद बसवले जातात. सध्या अर्ध्या कंटेनरमध्ये सुमारे पाचशे किलो कंदाची वाढ करता येणार आहे. त्यापासुन सुमारे एक ते सव्वा किलो केशर मिळण्याची आशा शैलेश यांनी व्यक्त केली आहे. यामधून त्याला सहा लखापर्यंत उत्पन्न येण्याची आशा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Farmer, Local18, Pune, Success story