मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Satara : दुष्काळी भागातील भावंडांची कमाल, 5 वर्षांमध्ये माळरानावर फुलवली वनराई! पाहा Video

Satara : दुष्काळी भागातील भावंडांची कमाल, 5 वर्षांमध्ये माळरानावर फुलवली वनराई! पाहा Video

X
रोहीत

रोहीत बनसोडे व रक्षिता बनसोडे यांनी पाणी फाऊंडेशनकडून प्रेरणा घेऊन श्रमदानाला सुरुवात केली.

रोहीत बनसोडे व रक्षिता बनसोडे यांनी पाणी फाऊंडेशनकडून प्रेरणा घेऊन श्रमदानाला सुरुवात केली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Satara, India

    सातारा, 16 नोव्हेंबर : सोशल मिडिया आणि रिल्सच्या जमान्यात तरुणाई आपला अधिक वेळ सोशल साईट्सवर घालवते. मात्र, सातारा  जिल्ह्यातील भावा बहिणीनं आपल्या वेळ पर्यावरणासाठी दिला आहे. रोहीत आणि रक्षिता बनसोडे अशी त्यांची नावे असून गेल्या पाच वर्षांपासून ते पर्यावरण रक्षणासाठी काम करीत आहेत. दुष्काळ मुक्तीसाठी अखंडित श्रमदानाची ज्योत पेटवून ती तेवत ठेवण्यासाठी संघर्षमय श्रमदानाची कडवी झुंज ओसाड माळरानावर, डोंगरावर देत आहेत. श्रमदानातून त्यांनी उजाड माळरानावर वनराई फुलवली आहे.

    सातारा जिल्ह्यातील माण (गोंदवले) या गावातील रोहीत बनसोडे व रक्षिता बनसोडे यांनी  पाणी फाऊंडेशनकडून प्रेरणा घेऊन श्रमदानाला सुरुवात केली. रोहीतने वयाच्या सोळाव्या तर रक्षिताने तेराव्या वर्षांपासून उजाड माळरानावर वनराई फुलवण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. 2016 पासून दोघे पर्यावरणासाठी श्रमदानाचे काम करीत आहेत.

    डोक्यावरून पाणी वाहून झाडांना दिले

    रोहीत बनसोडे आणि रक्षिताने श्रमदानातून 75 समतल चारी तयार केल्या. एक लहानसा पाझर तलाव तयार करून पावसाचे वाहून जाणारे एक कोटी लिटर पाणी अडवून जमिनीत मुरवले. मिळेल तिथून कळशी हंड्याच्या साहाय्याने वेळप्रसंगी दूरदूरवरून डोक्यावरून पाणी वाहून झाडांना घातले. ओसाड माळरानावर घामाच्या धारांचा अभिषेक घालून झाडांना जीवदान दिले. सध्या येथे हजारो झाडांची वनराई फुलली असून ओसाड माळरान हिरवाईने नटले आहे.

    1500 महिलांना आत्मनिर्भर करणाऱ्या अमृतचा प्रवास! Video

    'मिशन ऑक्सिजन' निसर्ग संवर्धनासाठी मोहीम

     रोहीत व रक्षिता यांच्या हस्ते  'मिशन ऑक्सिजन' मोहिमेच्या माध्यमातून चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. माध्यमातून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्रापैकी एक असलेले तीर्थक्षेत्र शिखर शिंगणापूर या देवस्थानाच्या पायथ्याशी असलेला मुंगीघाट या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात येत आहे. या ठिकाणी रोहीत व रक्षिता यांच्या हस्ते हे काम सुरू करण्यात आले आहे. दोघे या डोंगरावर वृक्ष लागवड करत आहेत.

    झाडे लावणे ही सर्वांची जबाबदारी आहे. रोहीत बनसोडे या युवकासारखी पर्यावरण निसर्गप्रेमी मुले प्रत्येक गावातील घराघरात तयार झाली पाहिजेत. रोहीतने केलेल्या कार्याची दखल वन विभागाने घेतली असून 'छत्रपती शिवाजी महाराज वनश्री' पुरस्कारासाठी त्याची शिफारस करण्यात आली असल्याची माहिती वनक्षेत्रपाल एम. पी. मुळे यांनी दिली.

    First published:

    Tags: Forest, Local18, Satara