Home /News /agriculture /

Raju Shetti : राजू शेट्टींवर शेतकऱ्यांचे प्रेम काही कमी नाही, लोकवर्गणीतून पहिला खासदार केले नंतर नवी कोरी फॉर्च्युनर दिली भेट

Raju Shetti : राजू शेट्टींवर शेतकऱ्यांचे प्रेम काही कमी नाही, लोकवर्गणीतून पहिला खासदार केले नंतर नवी कोरी फॉर्च्युनर दिली भेट

शेतकऱ्यांनी राजू शेट्टी यांना दोन वेळा कृषीरथ म्हणून फिरण्यासाठी गाडी भेट दिली. त्यामुळे राजू शेट्टी (raju shetti farmer leader) चांगलेच भारावून गेले आहेत.

  कोल्हापूर, 14 जून : शेतकऱ्यांच्या (farmers prtoblem) प्रश्नावर भल्याभल्यांना अंगावर घेत सामान्य शेतकऱ्यांना उस दराच्या (sugarcane rate) माध्यमातून मोठे केलेल्या राजू शेट्टीना (former mp raju shetti) शेतकऱ्यांनी आपल्या खिशातून पैसे घालत फिरण्यासाठी चक्क नवी कोरी अलीशान फॉर्च्युनर (new Fortuner) कार भेट दिली आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी त्यांना दोन वेळा कृषीरथ म्हणून फिरण्यासाठी गाडी भेट दिली. त्यामुळे राजू शेट्टी (raju shetti farmer leader) चांगलेच भारावून गेले आहेत. ते जिल्हा परिषद सदस्य होते त्यावेळी त्यांना शेतकऱ्यांनी क्वालिस गाडी भेट दिली होती. यावेळी त्यांना फॉर्च्युनर देण्यात आली आहे.

  राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनेकवेळा रक्त सांडले आहे. यामुळे राजू शेट्टींवर शेतकरी जिवापाड प्रेम करतात. यामुळेच लोकवर्गणी काढून राजू शेट्टींना खासदार करणाऱ्या शेतकऱ्यांनी नवी कोरी अलीशान फॉर्च्युनर कार भेट दिली आहे. राजू शेट्टी ज्यावेळी महाविकास आघाडीतून बाहेर पडले त्या दिवशी शेतकऱ्यांनी एका तासात 11 लाख रुपये जमा करत राजू शेट्टींना वाहन देण्याचे ठरवले. काल(दि. 13) त्यांना कृषीरथ देण्यात आला.

  हे ही वाचा : kolhapur crime : जमिनीच्या तुकड्यासाठी हुकूमशाही? लमान वसाहतीला मध्यरात्री लावली आग

  राजू शेट्टी यांना 2002 साली जिल्हा परिषदेमध्ये शेतकऱ्यांनी पहिल्यांदा लोकवर्गणी काढून पाठवले. या दरम्यान वर्षभराने शेतकऱ्यांनी वर्गणी काढून त्यांना क्वालिस गाडी भेट दिली. तिचा क्रमांक एमएच 4487 होता. 17 वर्षांत 12 लाख किलोमीटरचा प्रवास गाडीने केला. स्वाभिमानी संघटनेची राज्यभर बांधणी करण्यासाठी गाडीचा उपयोग झाला. शेट्टी यांनी 2004 च्या विधानसभेत नशीब आजमावले. शिरोळ मतदारसंघातून ते विजयी झाले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून ते 2009 च्या निवडणूक रिंगणात उतरले.

  मतदारांनी त्यांना साथ देत विजयाचे पारडे त्यांच्या बाजूने फिरवले. दोन वर्षांनंतर त्यांच्या दारात फॉर्च्युनर गाडीचे आगमन झाले. गाडीच्या नंबरवरून शेतकऱ्यांना साथ देण्याचा अनोखा संदेश दिला. गाडीवर 7227 क्रमांक चिकटला. अवघ्या चार वर्षांत गाडीने चार लाख 70 हजार किलोमीटरचा प्रवास केला. पुन्हा 2016 मध्ये इनोव्हा क्रिस्टा गाडीची खरेदी झाली. गाडीच्या नंबरमध्ये तडजोड केली नाही. गाडीने राज्यासह देशात आजअखेर 23 लाख 10 हजार किलोमीटरचा प्रवास केला असल्याचे त्यांचे स्विय्य सहाय्यक स्वस्तिक पाटील यांनी सांगितले. 

  हे ही वाचा : Sugarcane Production : साखर उत्पादनात महाराष्ट्राची बाजी, देशात पहिल्या तर जगात दुसऱ्या क्रमांकावर घेतले उत्पादन

  शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांची आंदोलने सुरू आहेत. शेट्टी आणि शेतकरी हे समीकरण पक्कं झालंय. दूध, ऊस दरवाढीसह विविध विषयांवरच्या आंदोलनात शेट्टींचा सक्रिय सहभाग असतो. पत्नी संगीता, मुलगा सौरभ त्यांच्याबरोबरीने काम करीत आहेत. निवडणूक प्रचारात त्यांचा सहभाग असतोच. तसा शेतकऱ्यांचे विविध प्रश्न जाणून घेण्यात ते कमी नाहीत. शेट्टी व कार्यकर्त्यांचे नाते दृढ बनले आहे. शेट्टींना साथ देण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेतात.

  लढाणाकरांच्या लोकवर्गणीतून रविकांत तुपकरांनाही चारचाकी प्रदान

  शेतकरी प्रश्नांची सोडवणूक, आंदोलनानिमित्ताने अख्खा महाराष्ट्र पालथा घालावा लागत असलेल्या रविकांत तुपकर यांच्याकडे अगदी कालपर्यंत स्वत:ची चारचाकी गाडी नव्हती. आतापर्यंत मित्रांनी दिलेल्या गाड्यांनीच चळवळीचं 'सारथ्य' केले होते. आपल्या कार्यकर्त्याला सांभाळणं, जपणं ही आपल्या समाजाचीच जबाबदारी आहे, या विचारांतून बुलढाण्यातील सर्वच क्षेत्रातील अराजकीय मंडळी एकत्र आली. अन् यातूनच समोर विचार आला तो लोकवर्गणीतून त्यांना चारचाकी वाहन घेऊन देण्याचा. हे वाहन लोकवर्गणीतून देण्यात येणार असल्याने त्याला 'लोकरथ' असं नाव देण्यात आले आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Kolhapur, Raju Shetti, Raju Shetti (Politician), Swabhimani Shetkari Sanghatana

  पुढील बातम्या