कोल्हापूर, 14 जून : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील (Kolhapur district) जयंसिंगपूर शहरालगत असलेल्या धरणगुत्ती गावात (dharangutti village) भटक्या विमुक्त जमातीतील लोक राहतात. हे लोक बऱ्याच दिवसांपासून राहत असल्याने त्यांनी तिथे झोपड्या बांधल्या आहेत. याचबरोबर त्यांना नागरीसुविधाही मिळत आहेत. दरम्यान अचानक अज्ञातांनी काल मध्यरात्री झोपड्या पेटवल्या नागरिकांच्या प्रसंगावधानाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. (Kolhapur crime)
जयसिंगपूर येथील शहरालगत असलेल्या धरणगुत्ती (ता.शिरोळ) येथील गट नं.343 मधील गेल्या अनेक वर्षापासून भटक्या समाजाचे नागरिक राहत आहेत. तर या झोपडपट्टीतील नागरिकांना या जागेवरून उठविण्यासाठी मोठे प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान सोमवारी मध्यरात्री येथील झोपड्या पेटविण्यात आल्या आहेत. यात कोणतही जीवितहानी झाली नसली तरी या जीवघेण्या प्रकारांमुळे या वसाहतीचा परिसर भीतीच्या छायेखाली आहे. याबाबत शिरोळ पोलीस ठाण्याशी (shirol police station) संपर्क साधला असता अद्याप यासंदर्भात कोणतीही तक्रार आलेली नाही. तक्रार दाखल झाल्यास योग्य तो तपास केला जाईल असे सांगण्यात आले.
हे ही वाचा : Monsoon Update : मान्सून मुंबई, पुण्यात नाही पण आहे तरी कुठे? राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा alert
याबाबत अधिक माहिती अशी, येथील लमाण वसाहतीमध्ये महावितरणला वीज कनेक्शन देण्यासाठी सर्व पुर्तता करूनही अचानकपणे काही बिल्डराच्या दबावामुळे वीज कनेक्शन देण्याचे काम थांबवले होते. ही व्यथा लमान वसाहतीतील महिला नागरीकांनी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासमोर मांडल्यानंतर तात्काळ वीज कनेक्शन द्या. असा आदेश ना.यड्रावकर यांनी (minister rajendra patil yadaravkar) तहसिलदार अपर्णा मोरे-धुमाळ व महावितरणचे अधिकारी वैभव गोंदील यांना दिले होते.
तर येथील लमाण वसाहतीमधून या नागरिकांना हुकूमशाही व दहपशाही करून धनदांडगे काही बिल्डरांच्याकडून या नागरीकांवर अन्याय केला जात आहे. अशातच आता सोमवारी मध्यरात्री येथील झोपडपट्टीत काहींनी आग लावून दिल्याने यात 2 झोपड्या जळाल्या आहेत. तर नागरिकांनी तात्काळ ही आग आटोक्यात आणून इतर मोठी जिवीत आणि वित्त हानी टाळली. यात दोन झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. तर पोलिसांनी तात्काळ गोरगरिबांच्या जीवावर उठणाऱ्याच्यवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांची आहे. याबात शिरोळ पोलीस ठाण्यात अद्यापही गुन्हा नोंद न झाल्याने वेगळ्याचर्चांना उधाण आले आहे.
हे ही वाचा : Pune : पुण्याची पगडी पुन्हा वादात! पंतप्रधान मोदींच्या ‘तुकाराम पगडी’वरील ओवी बदलली
राज्याचे आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मतदारसंघात हा प्रकार घडल्याने ते पुढे काय निर्णय घेतात याकडेही नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. याचबरोबर मागच्या कित्येक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना हाकलण्यासाठी झालेल्या कृत्याबाबत कोल्हापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.