मुंबई, 14 जून : यंदाचा साखर हंगाम (sugarcane season) अद्यापही सुरू आहे राज्यातील काही कारखाने सुरू आहेत. दरम्यान यंदा उसाच्या विक्रमी उत्पादनामुळे साखरेचे उत्पादनही (sugarcane production) मोठ्या प्रमाणात झाले. साखर उत्पादनात ब्राझीलनंतर महाराष्ट्र देशात पहिल्या तर जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर आहे. (Maharashtra ranks first in the country after Brazil and second in the world in terms of sugar production) यावर्षी राज्यातील 101 सहकारी आणि 98 खाजगी कारखान्यांमधून 9 जूनपर्यंत 13 कोटी 19 लाख 82 हजार टन उसातून 13 कोटी 72 लाख 23 हजार साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखर कारखान्यांमध्ये ३ कोटी ६ लाख टन अधिक उसाचे गाळप झाले.
राज्यातील 199 पैकी 188 कारखाने बंद झाले आहेत तर 10 कारखाने सुरू आहेत. दरम्यान महाराष्ट्र साखर उत्पादनात देशात पहिल्या क्रमांकावर आहे. देशातील 5 कोटी शेतकरी आणि राज्यातील 40 लाख शेतकरी ऊस पीक घेतात. या हंगामात महाराष्ट्रात १३ लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रात ऊस लावण्यात आला होता. यातून १३ कोटी २० लाख टन उसाचे उत्पादन झाले आहे. राज्यात साखर उत्पादनात कोल्हापूर विभाग आघाडीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणाग गाळप झाले. कोल्हापुरातील कारखान्यांमधील 2 कोटी 54 लाख 69 हजार उसापासून 3 कोटी 41 लाख टन साखरेचे उत्पादन झाले. राज्यात सर्वाधिक साखरेचे उत्पादन कोल्हापूर विभागात झाले.
हे ही वाचा : kolhapur crime : जमिनीच्या तुकड्यासाठी हुकूमशाही? लमान वसाहतीला मध्यरात्री लावली आग
पुणे विभागातील 30 कारखान्यांनी 2 कोटी 91 लाख 29 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले. याचबरोबर सोलापूरच्या 47 कारखान्यांमध्ये 2 कोटी 84 लाख 26 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. अहमदनगर विभागातील 28 कारखान्यांमध्ये 2 कोटी 60 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. तर औरंगाबाद विभागातील 24 कारखान्यांच्या 1 कोटी 32 लाख 80 हजार टन उसापासून 1 कोटी 29 लाख 26 हजार क्विंटन साखरेचे उत्पादन झाल्याची माहिती साखर संकुलातून मिळाली आहे.
नांदेड विभागातील 27 कारखान्यांच्या 1 कोटी 46 लाख 96 हजार टन उसापासून 1 कोटी 52 लाख 92 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. तर अमरावती विभागातील 3 कारखान्यांतील 10 लाख 3 हजार टन उसापासून 9 लाख 67 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून 4 कारखान्यांच्या 4 लाख 55 हजार टन उसापासून 3 लाख 82 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. नागपूर विभाग. सोलापूरच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यात सर्वाधिक ऊस गाळप करण्यात आले. यावर्षी या कारखान्यात 24 लाख 78 हजार 922 टन ऊस साखर उत्पादनासाठी वापरण्यात आला.
हे ही वाचा : शरद पवारांच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीवर चर्चा; चंद्रकांत पाटील यांचा शिवसेना, काँग्रेसला खोचक टोला
सातारा जिल्ह्यात अद्यापही ऊस शिल्लक
सातारा जिल्ह्यात अद्याप 20 हजार टन ऊस शिल्लक असताना सर्व कारखान्यांनी मात्र गाळप हंगामाची सांगता केली आहे. वाईसह जावळी, खंडाळा तालुक्यांतील 20 हजारांवर टन ऊस गाळपाविना उभा आहे. एकूण परिस्थिती बघता हा ऊस तुटणार नसल्याने शेतकऱ्यांना लाखोंचे नुकसान सहन करावे लागणार आहे. दरम्यान सातारा जिल्ह्यातील कित्येक शेतकऱ्यांना ऊस कारखान्याला जात नसल्याने पेटवून देत त्याचे जळण करण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही शेतकरी निराश झाले आहेत.
सातारा जिल्ह्यात 14 साखर कारखाने आहेत यामध्ये काही कारखान्यांनी मे महिन्यापर्यंत गाळप केले. अजिंक्यतारा कारखाना वगळता इतर सर्व कारखान्यांनी मे महिन्यांच्या सुरुवातीला कारखाने बंद केले. अजिंक्यतारा कारखान्याने ३ जूनअखेर गाळप केले. दरम्यान शिल्लक राहिलेल्या उसाचा प्रश्न गंभीर झाल्याने कोणाला जाब विचारायचा हा प्रश्न समोर राहिला आहे. याचबरोबर जिल्ह्यातील सर्व मंत्र्यांनी जबाबदारी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.