जाहिरात
मराठी बातम्या / मनी / कृषी / नोकरी सोडून सुरु केली खेकड्यांची शेती, आता करतोय लाखोंची कमाई! Video

नोकरी सोडून सुरु केली खेकड्यांची शेती, आता करतोय लाखोंची कमाई! Video

नोकरी सोडून सुरु केली खेकड्यांची शेती, आता करतोय लाखोंची कमाई! Video

विकास वझे या तरुणाने आधुनिक खेकड्यांच्या शेतीचा भन्नाट प्रयोग केला आहे. शेतीला जोड धंदा म्हणून त्याने हा प्रयोग केला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 09 नोव्हेंबर : अलीकडच्या काळात खेकड्यांना मोठी मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे जेवढी मागणी आहे तेवढा खेकड्यांचा पुरवठा नसल्याचं अनेकदा पहायला मिळतं. खेकडा म्हटलं की अनेकांच्या अंगावर काटा येतो. याला कारण म्हणजे त्याचा असणारा आकार, त्याचा येणारा वास. त्यामुळे अनेक जणांना खेकडा हा फक्त बघायला आवडतो. मात्र, येत्या काही दिवसात खेकडा खाण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे खेकड्याची मागणी देखील वाढू लागली आहे. हीच मागणी लक्षात घेता वसई तालुक्यातील भूईगाव येथे राहणाऱ्या विकास वझे या तरुणाने आधुनिक खेकड्यांच्या शेतीचा भन्नाट प्रयोग केला आहे. शेतीला जोड धंदा म्हणून त्याने हा प्रयोग केला आहे. खेकड्याच्या शेतीचा प्रयोग आजच्या तरुणांना मार्गदर्शक ठरणारा आहे. खेकडे पकडणे ही एक कला आहे पण त्याचबरोबर त्यासाठी खूप मेहनत आणि धाडसही लागते. त्यामुळे काही खास लोकच खेकडे पकडताना दिसतात. मात्र, मासे आणि इतर मांसाहारी पदार्थांच्या तुलनेत खेकड्यांच्या पुरवठा मागणीच्या प्रमाणात होत नाही. याचा विचार करून विकास वझे याने  खेकड्यांच्या शेतीचा अभ्यास करून हा प्रयोग केला आहे.

    Nashik : बदलत्या वातावरणाचा फटका, द्राक्ष उत्पादकांसमोर उभं टाकलं मोठं संकट, Video

    नोकरी सोडून सुरु केला व्यवसाय  विकास एसएससी शिक्षण आणि आय टी आय फिटर कोर्स करून एका खाजगी कंपनीत कामाला होता. 25 ते 30 हजारांची नोकरी सोडून त्याने खेकड्याची शेती करण्याचा निर्णय घेतला. स्वतःच काही तरी करायचं आहे. म्हणून त्याने अभ्यास करून हा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. विकास याने यासाठी थायलंड मधून वर्टिकल क्रॅब बॉक्स मागविले. विकास याने एक हजार बॉक्स मागवून एक एकर मध्ये सुरुवात केली. या मध्ये खाऱ्या पाण्यातील सिल्ला या जातीच्या खेकड्याची शेती तो करतो.

    News18लोकमत
    News18लोकमत

    दोन प्रकारच्या खेकड्याचे  घेतो उत्पादन

    यामध्ये हिरवे आणि लाल पाठ अश्या दोन प्रकारच्या खेकड्याचे उत्पादन घेतो. हे खेकडे कोंकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, या भागातून विकास आणतो. सध्या या व्यवसायातून विकास दर महिना 50 ते 60 हजार कमावतो. थोडी मेहनत आणि योग्य नियोजन करून खेकडे वाढवल्यास आर्थिक फायदा नक्कीच होईल, असं विकास वझे सांगतो. Video: शेतकऱ्यांनो, करू नका लहरी निसर्गाची काळजी, खेती ज्योतिष देणार सर्व माहिती! खेकडा संपूर्ण तयार होऊन विक्री साठी सहा महिन्यांचा कालावधी हे खेकडे प्रत्येक बॉक्स मध्ये एक आणि नेहमी पाण्यात असतात. तसेच यांना माश्यांचे लहान लहान तुकडे हे खाद्य म्हणून दिले जातात. तर हा खेकडा संपूर्ण तयार होऊन विक्रीसाठी सहा महिन्यांचा कालावधी लागतो. तसेच तयार झालेले खेकडे हे स्थानिक पातळीवर, हॉटेल, मासळी बाजारात विक्रीसाठी पाठविले जातात. तर येत्या काही दिवसांत एक्सपोर्ट करण्याचा देखील विकास याचा मानस आहे. सद्या विकास वझेद्वारे राबवला जात असलेला खेकड्यांच्या शेतीचा प्रयोग आजच्या तरुणांना मार्गदर्शक ठरणारा आहे. कारण, हा शेतीचा प्रयोग बघण्यासाठी राज्यभरातून शेतकरी येत आहेत. त्यांना विकास वझे हा योग्य मार्गदर्शन करत आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात