कोल्हापूर, 10 नोव्हेंबर : परस्थिती साजेशी नसताना देखील एकदा मनाशी पक्क केलं, तर आपण काहीही करू शकतो. हीच गोष्ट आपल्याला बापुसो मांगुरे यांनी दाखून दिली आहे. दिव्यांग असून सुद्धा 38 वर्षीय बापुसो मांगुरे यांनी खराब फ्रीजचा वापर करून हॅचिंग मशीनची निर्मिती केली आहे. शेतीपूरक उद्योग करणाऱ्यांसाठी मांगरे यांचा हा प्रयोग निश्चितच उपयोगी पडणारा आहे. कोल्हापुर च्या करवीर तालुक्यातील केकतवाडी हे बापूसो मांगरे यांचे गाव आहे. एका अपघातात त्यांना मनगटापासून पुढचा एक हात गमवावा लागला. शिक्षण दहावी नापास कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी एमआयडीसीत ते नोकरी करतात. मात्र, शेतीपूरक व्यवसाय म्हणून ते कोंबड्या व शेळीपालन देखील करतात. याबरोबरच त्यांनी घरातच शंभर ते सव्वाशे पक्ष्यांची हॅचिंग मशीन तयार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता आणि यासाठी त्यांनी हॅचिंग मशीनचा अभ्यास केला.
Video: शेतकऱ्यांनो, करू नका लहरी निसर्गाची काळजी, खेती ज्योतिष देणार सर्व माहिती!
शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना परवडेल अशा हॅचिंग मशीनची निर्मिती करण्यासाठी मांगुरे यांनी प्रयत्न केले. खराब फ्रीज पासून त्यांनी जवळपास 8-10 दिवसात हे हॅचिंग मशीन विकसित केले. जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी हॅचिंग मशिनची पाहणी केल्याचे मांगुरे यांनी सांगितले. हे मशीन अत्यंत चांगले आहे आणि पशुसंवर्धन विभागाकडून काही मदत देण्यासाठी प्रयत्न करु असे यावेळी त्यांनी सांगितले आहे, असे देखील मांगुरे म्हणाले. याची उपयुक्तता आहे जास्त ज्या ठिकाणी विजेचा जास्त प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी देखील या मशीन द्वारे जास्त नुकसान होत नाही. या हॅचिंग मशीनच्या माध्यमातून कोंबड्यांच्या पिलांचे उत्पादन घेता येते. इतर हॅचिंग मशीनमध्ये 75 ते 80 टक्के उत्पादन होत असते. मात्र, घरी तयार केलेल्या हॅचिंग मशीन मधून 90 टक्के उत्पादन होत असल्याचे बापुसो मांगरे सांगतात.
नोकरी सोडून सुरु केली खेकड्यांची शेती, आता करतोय लाखोंची कमाई! Video
कुठे आणि किती रुपयांना मिळेल हे मशीन? सध्या बाजारात शंभर-दीडशे पक्षांच्या हॅचिंग मशीनची किंमत किमान 60 हजार रुपयांपासून आहे. पण घरीच कमी खर्चात मांगुरे यांनी बनवलेल्या या हॅचिंग मशीनची किंमत 14 हजार रुपये आहे. जर तुम्हालाही हॅचिंग मशीन खरेदी करायची असेल तर तुम्ही 8888487177 या नंबर संपर्क साधू शकता.