जाहिरात
मराठी बातम्या / मनी / कृषी / Video: शेतकऱ्यांनो, करू नका लहरी निसर्गाची काळजी, खेती ज्योतिष देणार सर्व माहिती!

Video: शेतकऱ्यांनो, करू नका लहरी निसर्गाची काळजी, खेती ज्योतिष देणार सर्व माहिती!

Video: शेतकऱ्यांनो, करू नका लहरी निसर्गाची काळजी, खेती ज्योतिष देणार सर्व माहिती!

औरंगाबादच्या पितळे शेतकऱ्यांना पूर्वकल्पना देणारं स्टार्टअप सुरू केलं आहे. या स्टार्टअपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांना आवश्यक असलेली सर्व माहिती देण्यात येणार आहे.

  • -MIN READ Aurangabad,Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

    औरंगाबाद, 8 नोव्हेंबर:  शेती करताना शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी असतात अवेळी पडणारा पाऊस, नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतकऱ्यांचं अनेकदा नुकसान होतं औरंगाबाद शहरातील पितळे बंधूंनी शेतकऱ्यांच्या या अडचणीवर पर्याय शोधला आहे. त्यांनी शेतकऱ्यांना पूर्वकल्पना देणारं स्टार्टअप सुरू केलं आहे. या स्टार्टअपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांना आवश्यक असलेली सर्व माहिती देण्यात येणार आहे. काय आहे कल्पना? भारत हा कृषिप्रधान देश आहे भारतामध्ये सर्वाधिक नागरिक हे शेतीवर अवलंबून आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांकडून पारंपारिक पद्धतीने शेती केली जाते यातच नैसर्गिक आपत्ती अवेळी पडणारा पाऊस आणि नियोजनाचा अभाव यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. शेतकरी नेहमी अडचणीत असतो. औरंगाबादच्या समीर पितळे आणि प्रतिक पितळे या दोन बंधूंनी शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी यंत्र विकसित केला आहे.खेती ज्योतिष असं या यंत्राचं नाव आहे. पितळे बंधूंनी या यंत्राचा प्रयोग शेतीमध्ये करुन पाहिला आहे. त्या प्रयोगानंतर खेती ज्योतिष हे यंत्र उपयुक्त माहिती देते असा त्यांचा दावा आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    काय मिळणार माहिती? आर्द्रता,मातीचा ओलावा, सूर्यप्रकाश, तापमान, वाऱ्याची दिशा, पावसाचे प्रमाण, धुके, दवबिंदू आदींबाबत शास्त्रशुद्ध पद्धतीने माहिती देणारं ‘रोव्हिडो एलएलपी’ स्टार्टअप च्या माध्यमातून खेती ज्योतिष हे आयओटी डिव्हाईस त्यांनी तयार केलं आहे. औरंगाबाद शहरातील बंजारा कॉलनी भागामध्ये राहणारे समीर पितळे मेकॅनिकल इंजिनिअर तर प्रतीक पितळे इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहेत. दोघांचे शिक्षण औरंगाबाद शहरामध्येच झालं आहे. त्यांना 2018 साली स्टार्टअप इंडिया चॅलेंजबद्दल माहिती मिळाली. पिकांचे नुकसान कसे कमी करता येईल यावर ही स्पर्धा होती. यावेळी त्यांनी या विषयावर संशोधन केले. हे संशोधन करत असताना त्यांना शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी समजल्या. त्यानंतर त्यांनी याच विषयावर काम करण्याचे ठरवले. लवकरच वाढणार सोयाबीनचे दर, काय आहे कारण? वाचा सविस्तर असे करते खेती ज्योतिषी काम! शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सुरू करण्यात आलेले खेती ज्योतिष हे आयओटी डिव्हाईस शेताच्या मध्यभागी लावावी लागते. हे डिव्हाईस कोणत्याही विद्यूत प्रवाहावर नाही तर सौर ऊर्जेवर चालतं. या डिव्हाईसमधील सिम कार्ड इंटरनेटशी जोडलेलं आहे.  त्याद्वारे वाऱ्याची दिशा, शेतीचे तापमान, मातीचा ओलावा, पाऊस किती झाला? सूर्यप्रकाश, दवबिंदू या प्रकारच्या 16 विषयांची माहिती डेटा क्लाऊडवर गोळा होते. शेतकऱ्यांनी  हे यंत्र खरेदी केल्यानंतर त्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर ही माहिती उपलब्ध होते. ही माहिती मिळणे आणखी सोपं व्हावं यासाठी  एक ॲप्लिकेशन देखील तयार करण्याचे काम सुरू असल्याचे पितळे बंधू सांगतात. टोमॅटोचे दर घसरल्याने शेतकरी हवालदिल, उत्पादन खर्च निघणेही अवघड, VIDEO

    गुगल मॅपवरून साभार

    कसं खरेदी करणार ? तुम्हाला तुमच्या शेतीसाठी हे यंत्र खरेदी करायचं असेल तर तुम्ही पितळे बंधू यांच्या वेबसाईटवर किंवा त्यांना संपर्क साधून हे खरेदी करू शकता. या यंत्राची किंमत पंधरा हजार रुपये असून यामध्ये एक वर्षाची गॅरंटी देण्यात आली आहे. हे यंत्र रिचार्ज करण्यासाठी महिना 500 रुपये शुल्क आहे. मोबाईल क्रमांक:8378878128,7028721258 मेल आयडी:Pitalesameer@gmail.com वेबसाईट लिंक:www. Rowido.com

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात