पुणे, 04 फेब्रुवारी : राज्यात मागच्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी पुन्हा येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव हिमालयीन भागात वाढल्याने उत्तर भारतात पुन्हा थंडी वाढली आहे. त्यामुळे या भागाकडून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात थंड वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी राज्यात पुन्हा वाढली आहे. शुक्रवारी (दि.03) राज्यात औरंगाबाद शहराचे किमान तापमान 9.6 अंशांपर्यंत घसरले, तर पुणे शहराचे किमान तापमान 11.5 अंशांवर आले होते.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातून गेल्या 8 ते 10 दिवसांपासून थंडी गायब झाली होती. या परिणामामुळे राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आदी भागांत पावसानेदेखील हजेरी लावली होती. पुढील काही दिवस राज्यात थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे.
हे ही वाचा : अवकाळी पावसाने कांदा; केळी महाग होण्याची शक्यता, शेतीचे मोठे नुकसान
दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा दक्षिण भाग, मध्य प्रदेशाचा पश्चिम भाग आणि दक्षिणेकडील राज्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता हवामान विभागने अधिक आहे.मध्य महाराष्ट्रात बऱ्यापैकी अजून गारवा आहे. विदर्भातही नांदेड वगळता बाकी जिल्ह्यांमध्ये किमान आणि कमाल तापमान फार वाढण्याची शक्यता कमी असल्याचं IMD कडून अंदाज वर्तवण्यात आला आहे.
स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमध्ये आज पावसाची शक्यता आहे. तर तामिळनाडू आणि केरळच्या दक्षिण भागातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गिलगिट-बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद, लडाख, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागात येत्या २४ तासांत हलका ते मध्यम पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते.
हे ही वाचा : दिल्ली, गुजरात, मुंबईपेक्षा पुण्याची हवा खराब, हे आजार वाढण्याचा धोका
पंजाब, हरियाणा आणि पश्चिम राजस्थानच्या काही भागात रात्रीच्या किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने उत्तराखंडमधील चमोली, पिथौरागढ, रुद्रप्रयाग आणि उत्तरकाशी या चार जिल्ह्यांमध्ये तीन हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवरील भागात हिमस्खलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासन अलर्टवर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Weather, Weather Forecast, Weather Warnings, Winter, Winter session