कोल्हापूर, 27 मे : मागच्या आठवड्यात कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात मान्सून पूर्व पावसाने झोडपले. (kolhapur, sangli district pre monsoon rain) दरम्यान या पावसामुळे पिकांवर किडीचा प्रार्दुभाव (Insect infestation on crops) मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. पडलेल्या पावसामुळे हुमणीचा प्रादुर्भाव (humani Worm) सुरू झाला आहे. पुढील काळात या किडीचा सोयाबीन, भुईमूग, उसासह अन्य पिकांना मोठ्या फटका बसण्याची शक्यता आहे.
मान्सून पूर्व पावसाने कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात, उसाचे, केळीचे, द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले. याचबरोबर वळीवाचा पाऊस पडल्यानंतर हुमणीचे भुंग्यांचा त्रास आता शेतकऱ्यांना होत आहे. हुमणीचे भुंगे सायंकाळी जमिनीतून बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे. लिंब, बाभूळ यासह अन्य झाडावरून हे भुंगे मोठ्या प्रमाणात येतात. यामुळे पिकाच्या मुळावर किडे घाव घालत असल्याने पिक उन्मळून पडते. यामुळे सोयाबीन, ऊस या पिकाला मोठा दणका बसण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : बेळगावात भीषण अपघात; लग्नाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, चौघांचा मृत्यू
यावर उपाय काय?
प्रामुख्याने सायंकाळी जमा होणारे भुंगे प्रकाश सापळे किंवा गंध सापळे लावून गोळा करणे किंवा या झाडावर कीटकनाशकाची फवारणी करून भुंगे मारणे हा पर्याय शेतकऱ्यापुढे आहे. तसेच कृषी सेवा केंदांमध्ये हुमणी किडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कमी खर्चाची औषधे उपलब्ध आहेत. त्यासाठी अशा झाडांवर फवारणीसाठी क्लोरोपायरिफॉस 50 टक्के 4 मिली प्रती लिटर पाणी याप्रमाणात वापरावे. उस लागण केल्यानंतर हुमणीचा प्रादुर्भाव होवू नये, म्हणून लागण करतेवेळी बेसल डोसबरोबर दाणेदार कीटकनाशक एकरी 10 किलो वापरावे. उसामध्ये सोयाबीन किंवा भुईमूग आंतरपिक असल्यास हुमणीचा प्रादुर्भाव प्रथम या पिकांना होतो. यासाठी लागण करतानाच याची काळजी घ्यावी.
यावेळी क्लारोपायरिफॉस 50 टक्के 400 मिली प्रती 100 लिटर पाणी या प्रमाणात आंतरपिकाची आळवणी करावी. ज्या शेतकऱ्यांचा ऊस मोठा आहे, त्यांनी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात व्हीएसआय ईपीएन कल्चरचे एकरी 1 लिटर 200 लिटर पाण्यातून ठिबक अथवा पाटपाण्यातून आळवणी करावी. प्रादूर्भाव झाल्यानंतर होणाऱ्या नुकसानीपेक्षा हुमणी होवू नये, यासाठी काळ घेणे आवश्यक आहे.
हे ही वाचा : फक्त 4 दिवसांत PM Kisan योजनेचे पैसे बँक खात्यात जमा होणार, पण ‘या’ लोकांना प्रतीक्षा करावी लागणार!
मान्सून पूर्व पावसाचा या शेतकऱ्यांना मोठा फटका
राज्यात हवामान विभागाने (imd alert) दिलेल्या माहितीनुसार मागच्या २४ तासांपासून कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे.(kolhapur, sangli satara heavy rainfall) दरम्यान मान्सून पूर्व पावसाने (Pre-monsoon rains) अचानक हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची (farmer) ऐनवेळी मोठी धावपळ झाली आहे. शेतीची मशागतीची कामे जिथल्या तिथे थांबली तर उन्हाळी सोयाबीन, केळी, द्राक्ष बागायतदारांना याचा मोठा फटका बसला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कुरूंदवाड येथे एका शेतकऱ्याने थेट सोयाबीन फेकून दिले तर पंढपूरच्या शेतकऱ्यांचे केळी बागेचे मोठे नुकसान झाले आहे.
उन्हाळी सोयाबीन कापणीचा हंगाम सुरू असताना, गुरुवारी रात्री झालेल्या पावसाने सोयाबीन कापणीत मोठी अडचण निर्माण झाली आहे. सोयाबीनच्या बोगस बियाणांमुळे आधीच शेतकऱ्याची फसवणूक झाली असताना, हे दुहेरी संकट शेतकऱ्यांपुढे निर्माण झाले आहे. वादळी पावसाने खरिपाचा हंगाम धोक्यात आल्याचे कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पहायला मिळाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kolhapur, Rain in kolhapur, Sangli (City/Town/Village), Sugarcane, Sugarcane farmer