नवी दिल्ली, 27 मे : देशभरातील कोट्यावधी शेतकरी किसान सन्मान योजनेचा लाभ (PM Kisan sanman yojana) घेतात दरम्यान मागच्या काही महिन्यात किसान सन्मान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नव्हते. (farmer) यासंदर्भात आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अवघ्या चार दिवसांनी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 11व्या हप्त्याचे पैसे 31 मे रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात मिळण्याची घोषणा केंद्रीय कृषीमंत्र्यांनी केली होती. (central agriculture minister narendra tomar)
आतापर्यंत पंतप्रधान किसान योजनेचे 10 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात जमा झाले आहेत. मागच्या सहा महिन्यांपासून शेतकरी 11 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ३१ मे रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवले जाण्याची शक्यता आहे. शेवटचा हप्ता 1 जानेवारी 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला होता. कोट्यवधी शेतकऱ्यांना याचा फायदा झाला होता.
हे ही वाचा : Aryan Khan: कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरण; आर्यन खानला NCB कडून क्लीन चिट
सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत अनेक नियम लावले आहेत. असे अनेक लोक आहेत जे पीएम किसान योजनेसाठी पात्र नाहीत. अशा लोकांना पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्यासाठी पैसे मिळणार नाहीत. सरकारी नोकरदार असलेल्यांना पीएम किसान योजनेचा लाभ आता मिळणार नाही. केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही विभागात किंवा सरकारी संस्थेत काम करणारी व्यक्ती शेती करत असेल तर त्याला योजनेचा लाभ मिळणार नाही. असा नियम लागू करण्यात आला आहे.
हप्ता न मिळाल्यास यावर करा संपर्क
पीएम किसान टोल फ्री नंबर: 18001155266
पीएम किसान हेल्पलाईन नंबर:155261
पीएम किसान लँडलाईन नंबर्स: 011—23381092, 23382401
पीएम किसानचे अपडेट केलेले हेल्पलाईन नंबर: 011-24300606
पीएम किसान हेल्पलाईन: 0120-6025109
ई-मेल आईडी: pmkisan-ict@gov.in
हे ही वाचा : Gold Price Today : सोने दरात वाढ, पुन्हा 51 हजारजवळ; चांदीही 62 हजार पार
या तारखेपर्यंत केवायसी करणे बंधनकारक
पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी ३१ मे ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. जर एखाद्या शेतकऱ्याने ईके-वायसी केले नाही तर पीएम किसानद्वारे देण्यात येणारे त्यांच्या खात्यात जमा होणार नाहीत अशा परिस्थितीत, pmkisan-ict@gov.in शेतकरी वेबसाइटद्वारे ई-केवायसी करू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: PM Kisan