जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बेळगावात भीषण अपघात; लग्नाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, चौघांचा मृत्यू

बेळगावात भीषण अपघात; लग्नाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, चौघांचा मृत्यू

लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, अपघातात नववधूच्या भावासह चौघांचा जागीच मृत्यू

लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, अपघातात नववधूच्या भावासह चौघांचा जागीच मृत्यू

4 killed in road accident while going for marriage: लग्नाला निघालेल्या कुटुंबाच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी बेळगाव, 27 मे : लग्नाला निघालेल्या वऱ्हाड्यांच्या गाडीला भीषण अपघात (road accident) झाला आहे. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात (Pune Bangalore National Highway) झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात चौघांचा मृत्यू झाला आहे. बेळगावहून निप्पाणीच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरने वऱ्हाड्यांच्या कारला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. नवरी मुलीच्या भावासह चौघांचा मृत्यू मृतकांमध्ये नवरी मुलीचा भाऊ, काका, काकू आणि आजी यांचा समावेश आहे. या अपघातात इतर प्रवासी जखमी झाले आहेत. मृत आणि जखमी सर्वजण निपाणी तालुक्यातील बोरगाववाडी गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. वाचा : कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरण; आर्यनकडे ड्रग्ज होते की नाही? NCBने केला मोठा खुलासा कारमध्ये अडकून होते मृतदेह भरधाव कंटेनरने वऱ्हाड्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, गाडी संपूर्णपणे चक्काचूर झाली. अपघातानंतर जवळपास तासभर मृतक हे गाडीतच अडकून होते. यावरुनच हा अपघात किती भीषण होता याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, स्तवनिधी येथे लग्नासाठी सर्व वऱ्हाडी निघाले होते. त्याचवेळी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटात हा अपघात झाला आहे. अपघातात छाया आदगोंडा पाटील, आदगोंडा बाबू पाटील, महेश देवगोंडा पाटील आणि चंपाताई मगदूप यांचा मृत्यू झाला आहे. महेश देवगोंडा पाटील हा नवरी मुलीचा भाऊ होता. उत्तरकाशीत महाराष्ट्रातील भाविकांची गाडी दरीत कोसळली भाविकांनी भरलेली बोलेरो गाडी थेट दरीत कोसळली. या अपघातात तीन भाविकांचा मृत्यू झाला आहे तर 10 जखमी झाले आहेत. उत्तरकाशीतील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर स्यानाचट्टी जवळ हा भीषण अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. एसडीआरएफच्या टीमने 10 जणांना रेस्क्यू केलं आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातातील जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील भाविक बोलेरो गाडीने गुरुवारी सायंकाळच्या सुमारास बडकोटच्या दिशेने निघाले होते. त्याच दरम्यान वाटेत त्यांच्या गाडीला अपघात झाला. जमुनोत्रीपासून काही किलोमीटर अंतरावर असताना बोरेलो गाडी दरीत कोसळली. गाडी चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात