मराठी बातम्या /बातम्या /agriculture /

Vidarbha farmers : विदर्भातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणारी नवी योजना; उत्पादन खर्चही कमी

Vidarbha farmers : विदर्भातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणारी नवी योजना; उत्पादन खर्चही कमी

राज्यातील विदर्भात (Vidarbha farmers) एक प्रकल्प राबवण्यात आला आहे. पसुसंवर्धन मंत्री सुनिल केदार (minster sunil kedar) यांनी शेतकरी उत्पादन कंपनीचे उद्घाटन केले.

राज्यातील विदर्भात (Vidarbha farmers) एक प्रकल्प राबवण्यात आला आहे. पसुसंवर्धन मंत्री सुनिल केदार (minster sunil kedar) यांनी शेतकरी उत्पादन कंपनीचे उद्घाटन केले.

राज्यातील विदर्भात (Vidarbha farmers) एक प्रकल्प राबवण्यात आला आहे. पसुसंवर्धन मंत्री सुनिल केदार (minster sunil kedar) यांनी शेतकरी उत्पादन कंपनीचे उद्घाटन केले.

  • Published by:  Sandeep Shirguppe

नागपूर, 14  मे : राज्यातील शेतकरी विवीध संकटांनी घाईला आला आहे त्याला सध्या आधार देण्याची गरज आहे. दरम्यान आपला देशाची अर्थव्यवस्था कृषि क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात अवंलबून आहे. यासाठी शेती उपयुक्त तंत्रज्ञानाची सध्या शेतकऱ्यांना गरज आहे. राज्यातील विदर्भात (Vidarbha farmers) असाच एक प्रकल्प राबवण्यात आला आहे. पसुसंवर्धन मंत्री सुनिल केदार (minster sunil kedar) यांनी शेतकरी उत्पादन कंपनीचे उद्घाटन केले. शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादक कंपनीच्या (Farmer Production Company) सहाय्याने शेती केल्यास त्यांच्या उत्पादन खर्चात घट होऊन उत्पन्नात वाढ होईल, असे  प्रतिपादन पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी शेतकरी उत्पादन कंपनीच्या उद्घाटनावेळी शेतकऱ्यांना आवाहन केले.

शेतकरी उत्पादक कंपनीला शासनाचे (Farmer Production Company) कोणतेही बंधन नसून सर्वाधिकार असल्यामुळे कंपनीच्या माध्यमातून शेतीविषयक सर्व कामे व यंत्रसामुग्री खरेदी केल्यास सभासदांना त्याचा फायदा होईल. यासाठी शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद होऊन यांत्रिकीकरणाचा नेमका उपयोग कसा करायचा हे शिकता येईल. कंपनीचे व एकत्रित प्रयोगाचे फायदे असतात. (Vidarbha farmers)

हे ही वाचा : आदित्य ठाकरेंचा शिवसैनिकांना साष्टांग दंडवत, भाषणात कार्यकर्त्यांचं कौतुक, म्हणाले....

अमरावती जिल्ह्यात पोहरा येथे गोट बिडींग फार्म 250 एकर जमिनीवर तयार करण्यात आला आहे, त्याच धर्तीवर रामटेक तालुक्यात गोट बिडींग फार्म तयार करण्यात येणार असून प्रत्येकाला 1 शेळी मोफत देण्याची योजना आखण्यात आली असल्याचे केदार यांनी सांगितले.

ग्रामीण अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी शेती उद्योगावर भर देत शेळी व दुधाळ जनावरांच्या पूरक व्यवसायावर शेतकऱ्यांनी अधिक लक्ष देण्याचे आवाहन ग्रामीण अर्थव्यवस्थेबाबत मार्गदर्शन करतांना केंदार यांनी केले. यावर चिंतन व मनन करण्याची आवश्यकता  त्यांनी व्यक्त केली.

जिल्हा परिषदेद्वारे शेळी गट व दुधाळ जनावरे वाटप कार्यक्रम ग्रामीण भागात राबविण्यात येत असून हा प्रायोगिक तत्वावरील प्रकल्प यशस्वी झाल्यास तो राज्यात  राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आधुनिक काळात शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही त्यासाठी या कार्यशाळेला अनन्यसाधारण महत्व आहे. नाशिक येथील शेतकरी उत्पादक कंपनीला कृषी सभापतींनी भेट देऊन तेथील कार्यपध्दती जाणून घ्यावी व त्याचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना द्यावा, असे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा : आजच्या सभेत उद्धव ठाकरे जनतेच्या मनातील या प्रश्नांची उत्तरे देणार का? नितेश राणेंचा सवाल

शेतकरी उत्पादक कंपनीच्या संकल्पनेबाबत विस्तृत माहिती देताना दीपक झंवर यांनी या कंपनीचे सभासद झाल्यास त्यांचा निश्चितच शेतकऱ्यांना लाभ होईल, असे सांगितले. कंपनी ॲक्टनुसार सभासद होण्यासाठी सातबारा व आधार कार्ड आवश्यक आहे. त्यासोबत कंपनीच्या कार्यपध्दतीबाबत माहिती त्यांनी दिली.

‘सभापती आपल्या शिवारात’ या कार्यक्रमात क्षेत्रीय भेटी देऊन शेतकऱ्यांना या कंपनीबाबत माहिती देवून मार्गदर्शन करण्यात येईल, असे कृषी सभापती तापेश्वर वैद्य यांनी सांगितले. कृषी क्षेत्राचे आरोग्य बिघडल्यामुळेच मानवाचे आरोग्य आधुनिक काळात बिघडले आहे, त्यामुळे विस्कळीत शेती व्यवसायास संजीवनी देण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद व्हा. शेतकरी खरा शास्त्रज्ञ आहे, त्याला आर्थिक पाठबळ दिल्यास ते शक्य होईल. त्याबरोबर येथील मिरची, तांदूळ व संत्रा विदेशात जात आहे. शेतबांधावरच पॅकींगची व्यवस्था झाल्यास शेतकरी उद्योजकही होईल, असे ते म्हणाले.

First published:

Tags: Farmer, Vidarbha, शेतकरी