Home /News /mumbai /

आदित्य ठाकरेंचा शिवसैनिकांना साष्टांग दंडवत, भाषणात कार्यकर्त्यांचं कौतुक, म्हणाले....

आदित्य ठाकरेंचा शिवसैनिकांना साष्टांग दंडवत, भाषणात कार्यकर्त्यांचं कौतुक, म्हणाले....

भाषणासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर ते मंचावर समोर आले. यावेळी त्यांनी शिवसैनिकांना साष्टांग दंडवत घातला.

    मुंबई, 14 मे : मुंबईच्या बीकेसी मैदानात शिवसेनेची आज मोठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. जवळपास दोन वर्षांनी शिवसेनेची खुल्या मैदानावरील ही सभा आहे. त्यामुळे हजारो शिवसैनिक या सभेला हजर राहिले आहेत. तसेच शिवसेनेचे जवळपास सर्वच दिग्गज नेते या सभेला हजर आहेत. या सभेत भाषणासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर ते मंचावर समोर आले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठा जयघोष केला. घोषणाबाजी केली. शिवसैनिकांच्या या घोषणाबाजीला आदित्य ठाकरेंनी प्रतिसाद दिला. त्यानंतर आदित्य ठाकरे हे मंचावर शिवसैनिकांसमोर नतमस्तक झाले. त्यांनी शिवसैनिकांना साष्टांग दंडवत घातला. कोरोना संकटानंतर जवळपास दोन वर्षांनी शिवसेनेची सभा होतेय. कोरोना काळात शिवसैनिकांनी केलेल्या कामांचं आदित्य ठाकरे यांनी कौतुक केलं. 'तुमच्यासमोर नतमस्तक होताना पंचमुखी हनुमान दिसले' "जय महाराष्ट्र! खरंतर माझ्याकडे बोलण्यासाठी आज शब्द नाहीत. मी येताना गर्दी बघितली. आल्यावर गर्दी बघितली. इथे शिवप्रेमी जमले आहेत. पहिली रांग वांद्रेमध्ये असेल तर शेवटची रांग कुर्ल्यापर्यंत पोहोचलेली आहे. एवढी तुफान गर्दी आहे. माझाही चालत येण्याचा विचार होता. आजची सभेला तुफान गर्दी आहे. मला आपल्यासमोर नतमस्तक होताना या सर्व जनतेमध्ये पंचरुपी, पंचमुखी हनुमान दिसले", असं आदित्य ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले.

    तुमच्या शहरातून (मुंबई)

    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या