कोल्हापूर, 02 जून : हवामान खात्याच्या अंदाजानुसार (IMD ALERT) राज्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान कोल्हापूर, बेळगाव, सांगली, या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. (Heavy rains along with strong winds lashed Kolhapur, Belgaum and Sangli districts) दुपारच्या सुमारास कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Rain) चंदगड, आजरा गडहिंग्लज तालुक्यात पावसाला सुरूवात झाली होती. गोव्याच्या सीमेवरून आलेल्या पावसाने कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला धडकी भरावी एवढ्या जोरात मान्सून पूर्व पावसाने (pre monsoon rain) हजेरी लावली. दरम्यान याबाबत कोल्हापूर जिल्हा आपत्ती विभागाकडून माहिती देण्यात आली होती. (Kolhapur District Disaster Division)
आज सायंकाळी फक्त ३० मिनिटे झालेल्या पावसाने अक्षरश: लोकांची दैना उडाली. पावसाची भयानकता इतकी होती फक्त 30 मिनिटात पाणी पाणी झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक घरांची छप्पर उडून गेली तर पत्र्याचे शेड उद्ध्वस्त झाले. शहरातील जयंती नाल्याच्या शेजारी खानविलकर पंपाजवळ भले मोठे झाड कोसळल्याने शहरातील मुख्य रस्ता असल्याने काही काळ वाहतूक खोळांबली होती.
हे ही वाचा : औरंगाबाद दौऱ्याच्या आधी आली मुख्यमंत्र्यांना जाग, पाणी प्रश्नावर दिले कडक आदेश
2/06, 7.30pm Mod to Severe thunderstorm activity over N KA, Goa, S Konkan and south malaysia Maharashtra in last 3 hrs as seen from IMD Doppler radar Goa observations pic.twitter.com/zO11UjFoha
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 2, 2022
30 मिनिटांमध्ये पावसाने रौद्ररुप धारण केल्याने अनेक ठिकाणी वित्तहानीच्या घटना घडल्या. तुफानी वारा आणि कोसळणाऱ्या गारांमुळे काही काळ सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. पावसाने धुमाकूळ केल्याने ठिकठिकाणी वाहतूक ठप्प झाल्याने रस्त्यावर वाहने अडकून पडली.जोरदार वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून, तर काही ठिकाणी फांद्या कोसळल्याची घटना घडल्या. पावसाची भयानकता इतकी होती की, समोरील तब्बल 30 ते 40 फुटांवरील काहीच दिसून येत नव्हते. त्यामुळे वाहनधारकांना वाहने रस्त्याच्या बाजूला उभी करून थांबावे लागले.
अनेक वाहनांवर झाडांच्या फांद्या कोसळल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तब्बल अर्ध्या तासानंतर पावसाचा जोर कमी झाल्याने काहीसा दिलासा मिळाला. मात्र, अर्ध्या तासाच्या पावसाने अनेक ठिकाणी घरांची छप्पर उडून गेली.
कोल्हापूर जिल्ह्यासह, बेळगावच्या सीमाभागात जोरदार पावसाने हजेरी लावली, दरम्यान या पावसाने शेतीच्या कामांना वेग येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपली शेती तयार करून ठेवली आहे त्या शेतकऱ्यांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे तर काही शेतकऱ्यांच्या फळपिकांना मोठा फटका बसला आहे.
(हे ही वाचा : Video : परी नटली आईच्या मेंदीसाठी! स्वीट मायराच्या क्यूट लुकनं जिंकलं चाहत्यांच मन)
राज्याच्या सीमेवर मान्सूनने हजेर लावली असताना मान्सून पूर्व पावसाने मात्र राज्यातील अनेक जिल्ह्यात हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाचा पाऊस झाला, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, तसेच कोकणातील काही तालुक्यात पावसाने हजेरी लावली. दरम्यान सोलापूर जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर काही शेतकऱ्यांनी पेरणीसाठी लगबग सुरू केली आहे.
राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान झाल्याने विविध ठिकाणी पावसाला सुरूवात झाली आहे. आज (ता. 02) कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पूर्वमोसमी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मागच्या 24 तासांमध्ये वर्धा येथे 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामानामुळे राज्यात ढगाळ वातावरण होत असून, उकाड्यात वाढ झाली आहे. रत्नागिरी, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांत काही ठिकाणी, तर नाशिक, नगर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kolhapur, Monsoon, Rain in kolhapur