मुंबई, 2 जून - माझी तुझी रेशीमगाठ (Mazi Tuzi Reshimgath) सध्या नेहा आणि यशच्या लग्नाची धामधून सुरू आहे. आजोबांनी लग्नाला परवानगी दिल्यानंतर चौधरी पॅलेसमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नेहासह संपूर्ण चौधरी कुटुंब मेंदी ( neha mehendi ceremony look ) सोहळ्यासाठी सजलं आहे. पण या सगळ्यात भाव खावून जातोय तो छोट्या परीचा मेंदी लुक. सध्या छोट्या परीचा क्यूट लुक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. परीच्या आईची म्हणजे नेहाच मेंदी सोहळा आहे. नेहा देखील मेंदी सोहळ्यासाठी छान नटली आहे. शिवाय छोटी परी देखील आईच्या मेंदी सोहळ्यासाठी छान मेंदी रंगाचा फेरी फ्रॉक घालून सजली आहे. तिचा क्यूट अंदाज चाहत्यांना देखील खूप आवडलेला आहे. परी या व्हिडिओमध्ये मेंदी कोनने मेंदी काढताना दिसत आहे. वाचा- अरुंधती होणार आजी! अनघाला गेले दिवस;पण अभीच्या ‘त्या’ निर्णयामुळं कहाणीत ट्विस्ट परीची भूमिका मालिकेत मायरा वायकुळ साकारताना दिसते. तिचा सोशल मीडियावर प्रचंड चाहता वर्ग आहे. काहीजण तर परीसाठी मालिका पाहत असल्याचे सांगताना दिसतात. परी नेहमीच तिच्या निरागस अभिनयाने प्रेक्षकाचं मन जिंकताना दिसते. आता देखील तिचा हा क्यूट व्हिडिओ प्रेक्षकांना खूप आवडलेला आहे. वाचा- ‘तिमिरातील तिरीपेचा शोध मी घेईन…’ प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट नेमकी कशाबद्दल? यश आणि नेह सर्वांची आवडती जोडी आहे. नेहाची भूमिका अभिनेत्री प्रार्था बेहेरे तर यशची भूमिका श्रेयस तळपदे साकारताना दिसतो. छोड्या पडद्यावरील लोकप्रिय अशी ही जोडी लवकरच मालिकेत रेशीमगाठ बांधणार आहे. या दोघांच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना देखील सुरूवात झाली आहे. नेहाला यशच्या नावाची मेंदी लागणार आहे. यासाठी नवराई नेहा छान नटली देखील आहे. तिचा मेंदी लुक सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
लवकरच ही जोडी लग्न करणार आहे. छोट्या पडद्यावरील सर्वांत ग्रॅंड लग्न नेहा आणि यशचं असल्याची सध्या चर्चा आहे. लग्नापूर्वी अर्थातच येत्या भागात यश आणि नेहाचा साखरपुडा पाहायला मिळणार आहे. सध्या सोशल मीडियावर या मालिकेचे नवे प्रोमो पाहायला मिळत आहेत. यामध्ये नेहा आणि यश आपल्या साखरपुड्यासाठी पारंपरिक अंदाजात नटलेले दिसून येत आहेत. नेहाने हिरव्या रंगाची सुंदर साडी नेसली आहे. केसांत गजरा माळला आहे. शिवाय सुंदर अशी ऑक्सइड ज्वेलरी घातली आहे. नेहाचा हा लूक सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. शिवाय साखरपुड्यानंतर चिमुकली परी सर्व प्रेक्षकांना लग्नाला येण्याचा गोड आग्रह करताना दिसून येत आहे. प्रेक्षक मालिकेतील हा ट्रॅक पाहण्यासाठी फारच उत्सुक आहेत

)







