मराठी बातम्या /बातम्या /agriculture /Agriculture Department : कोल्हापूर जिल्ह्याचा 'हा' पॅटर्न राज्यभर राबवण्यासाठी हालचाली कृषी मंत्र्याचे आश्वासन

Agriculture Department : कोल्हापूर जिल्ह्याचा 'हा' पॅटर्न राज्यभर राबवण्यासाठी हालचाली कृषी मंत्र्याचे आश्वासन

कोल्हापूर जिल्ह्याला (KOLHAPUR DISTRICT) शाहू महाराजांचा (shahu maharaj) वारसा लाभल्याने या जिल्ह्यात घेतलेले निर्णय राज्यपातळीवर दखल पात्र होतात.

कोल्हापूर जिल्ह्याला (KOLHAPUR DISTRICT) शाहू महाराजांचा (shahu maharaj) वारसा लाभल्याने या जिल्ह्यात घेतलेले निर्णय राज्यपातळीवर दखल पात्र होतात.

कोल्हापूर जिल्ह्याला (KOLHAPUR DISTRICT) शाहू महाराजांचा (shahu maharaj) वारसा लाभल्याने या जिल्ह्यात घेतलेले निर्णय राज्यपातळीवर दखल पात्र होतात.

कोल्हापूर,18 जून : कोल्हापूर जिल्ह्याला (KOLHAPUR DISTRICT) शाहू महाराजांचा (shahu maharaj) वारसा लाभल्याने या जिल्ह्यात घेतलेले निर्णय राज्यपातळीवर दखल पात्र होतात. मागच्या दोन महिन्यांपूर्वी विधवा प्रतिबंदी कायदा करण्यात आला याचीही चर्चा राज्यात झाली. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात शेती (Kolhapur agriculture department) भरपूर असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी (Kolhapur collector) एक नवीन उपक्रम राबवला आहे. जिल्ह्यात कोरोना काळात (corona period) विधवा झालेल्या महिलांना मोफत पेरणीसाठी बियाणे देणार (Widows will be given seeds for free sowing) असल्याचे सांगितले. दरम्यान हा पॅटर्न राज्यभर राबवणार असल्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे (agriculture minister dadaji bhuse) यांनी सांगितले

कोरोनामुळे विधवा झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून पेरणीसाठी मोफत बियाणे देण्यात येत आहे, हा स्तुत्य उपक्रम आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाची राज्यभर अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असे कृषी मंत्री दादाजी भुसे म्हणाले.

कृषी विभागाची कोल्हापूर व सांगली जिल्ह्याची आढावा बैठक कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. 

हे ही वाचा : 'पाण्यापासूनही विमान आणि रेल्वे चालवणार', नितीन गडकरींचा नेमका प्लॅन काय?

कृषी मंत्री दादाजी भुसे म्हणाले, शेतकऱ्यांना बियाणे व खतांची कमतरता भासू नये, यासाठी राज्यव्यापी नियोजन करण्यात आले असून गरज भासल्यास बफर स्टॉक मधून खते व बियाणे उपलब्ध करुन देण्यात येतील. याबाबतीत गैरप्रकार आढळून आल्यास कृषी विभागाकडे तक्रार करा, असे सांगून शेतकऱ्यांनी पुरेशा प्रमाणात पाऊस पडल्याशिवाय पेरणी करु नये, जेणेकरुन दुबार पेरणी करावी लागणार नाही, असे आवाहन भुसे यांनी केले.

कोल्हापूर समृद्ध जिल्हा आहे. कोल्हापुरी गुळाच्या नावावर अन्य राज्यातील गुळाची विक्री होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्यात येतील. कोल्हापुरी गुळ, आजरा घनसाळ तांदळाला भौगोलिक (जीआय) मानांकन मिळाले आहे. कोल्हापूरी गुळ, आजरा घनसाळ तांदूळ, सांगलीचे बेदाणे(मनुके) व हळद उत्पादक शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी  या उत्पादनांचे मूल्यवर्धन करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच चंदगड भागातील काजूला जीआय मानांकन मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करण्यात येतील. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ व हातकणंगले तालुक्यात संकरित भाजीपाला बियाणे उत्पादन सुरु होण्यासाठीही सहकार्य करु, असेही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा : सिद्धू मुसेवालाला खरंच संतोष जाधवने मारली गोळी? 5 दिवसांच्या चौकशीत नवा खुलासा, प्रकरणाला वेगळंच वळण

जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी कृषी क्षेत्राच्या विकासाला चालना दिली. या भागात शेतकरी विविध नाविन्यपूर्ण प्रयोग राबवित आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र कृषी क्षेत्राच्या संपन्नतेसाठी ओळखला जातो. कृषी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. 

First published:
top videos

    Tags: Agriculture, Corona, Farmer, Kolhapur, Seed bank