पुणे, 28 मे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची ओळख त्यांच्या कामातून आहे. सकाळी 6 वाजल्यापासून रात्रीपर्यंत कामात कोणताही कंटाळा नाही किंवा कोणतीही कसर ते ठेवत नसल्याने त्यांची प्रशासकिय यंत्रनेवर मोठी पकड आहे. दरम्यान पुण्यातील एका गोधन कृषी प्रदर्शनाच्या (Agricultural Exhibition) उदघाटनादरम्यान अजित पवार यांनी आपल्या कामाची आणि हजरजबाबीपणाची पुन्हा एकदा झलक दाखवली. कृषी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची अशी सरबत्ती केली की अधिकाऱ्यांना उत्तरे देताना दमछाक झाल्याचे दिसून आले.
गोधन प्रदर्शनाचे शुक्रवारी (ता. 27) उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी प्रात्यक्षिके व देशी गाईंची (cow) भल्या सकाळी एवढ्या बारकाईने पाहणी केली. यामध्ये कृषी अधिकाऱ्यांना आणि शास्त्रज्ञांनाही माहिती नाही ती माहिती पवारांनी विचारल्याने अधिकारी आणि शास्त्रज्ञ दोघांचीही दमछाक झाली. मुळात, पवारांनी स्वतः लहानपणापासून देशी गायी व गोठ्याचे व्यवस्थापन केलेले असल्याने बारीकसारीक माहिती त्यांना होती. त्यामुळे कधी प्रश्नांची सरबत्ती तर कधी मिश्किल टिप्पणी करीत तर कधी कौतुकाची थाप मारत उपमुख्यमंत्र्यांनी सर्व उपक्रमांची आस्थेने माहिती घेतली.
हे ही वाचा : 90 हजारांच्या पैठण्या चोरताना कॅमेऱ्यात कैद झाल्या दोन महिला, Live Video
एक हजार जनावरांपासून दहा टनी गोबर गैस प्लॅन्ट तुम्ही तयार करताय; पण छोटया शेतकऱ्यांना परवडणारा प्लॅन्ट किती खर्चाचा असतो, आधुनिक पद्धतीने उभारलेल्या गोठ्यात जुन्या लाकडाचा वापर का केला, नवीन गोठ्यात डोंगळे कसे, संकरित आणि देशी गायीच्या शेणखतात दर्जाविषयक फरक कोणता, धारपारकर गोवंशाच्या असे नानाविध शास्त्रशुद्ध प्रश्न विचारणारे उपमुख्यमंत्री आणि त्यांचा अभ्यास पाहून सगळ्याना आश्चर्य वाटत होते.
यावेळी पवार म्हणाले की, मला या विषयात आधीपासून आवड आहे. तुम्ही मला लवकर बोलवायला पाहिजे होते, मी येणार म्हणून तुम्ही इथे रेड कार्पेट टाकले पण गोठ्यासाठी असलेल्या जमिनीचे लेव्हलिंग तुम्ही केलेले नाही. मला इथे बोलावण्यापूर्वी नीट तयारी करायला हवी होती. कारण, मी एकदा आलो की सर्व बारकाईन शास्त्रशुद्ध विचारत असतो, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याने सगळ्यांची धावपळ सुरू झाली.
हे ही वाचा : Mumbai Crime: OLA टॅक्सी चालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, मुंबईतील धक्कादायक घटना
गोबर गॅस, सौर प्रकल्प, देशी गोवंश, गोधनापासून तयार केलेली उत्पादने, गोठा व्यवस्थापन अशा सर्व ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या आणि माहिती घेतली. देशी अंडी स्टॉलवर पवार यांनी देशी अंड्यांचा भाव विचारला. ते म्हणाले की, अरे ही देशी अंडी ग्राहकांना हवी असतात. पण लवकर उपलब्ध होत नाहीत. त्याच्या मार्केटिंगसाठी तुम्ही वेगवेगळ्या युक्त्या केल्या पाहिजे.! ही सूचना ऐकून विद्यार्थीही चकित झाले.
उपमुख्यमंत्र्यांनी तासभर फिरून सर्व उपक्रमांची सखोल माहिती घेतली. शेवटच्या टप्प्यात ते म्हणाले की, तुमचे संशोधन आणि प्रयत्न खूप चांगले आहेत. पण, अजून नीटनेटके करा. निधीची कुठे गरज पडतेय, काय करायला हवे हे एकदा सविस्तर बसून ठरवा आणि माझ्याकडे या. मी तुम्हाला हवी ती मदत करायला तयार आहे. अजितदादा आपल्या रागाने नव्हे; तर तळमळीने सूचना करीत असल्याची जाणीव सर्व शास्त्रज्ञांना झाल्याचे तिथे दिसून आले. या भेटी दरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी शेतकरी कुटुंबातील कृषी शाखेच्या विद्यार्थी विद्यार्थिनी, गोपालक, शास्त्रज्ञ, महिला मजुरांशीही जिव्हाळ्याने संवाद साधला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agriculture, Ajit pawar, Pune (City/Town/Village), Pune ajit pawar